नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘सरकार झोपेत निर्णय घेत नाही, तुम्ही स्वप्नातच आनंद घ्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जनता झोपेत असनाच महाविकास आघाडीचं हे सरकार (Mahavikas Aghadi Government)  पडेल असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. तर या विधानावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी पाटील यांचा संचार घेत त्यांना प्रत्युत्तर दिल आहे. जनता झोपलेली असताना महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government)  निर्णय घेत नाही, तर लोकांच्या समोर हे सरकार निर्णय घेतं असे प्रत्युत्तर मलिक (Nawab Malik ) यांनी दिलं आहे.

नवाब मलिक म्हणाले, चंद्रकांतदादा रात्री स्वप्न बघतात आणि सकाळी बोलतात. त्यांना त्या स्वप्नात आनंद भेटत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा असा टोला देखील मलिक यांनी लगावला आहे. पुढे मलिक म्हणाले, आघाडी सरकार एकजुटीनं काम करतंय. ‘ऑपरेशन लोटस’ केलं पाहिजे अशी काही लोकांची इच्छा आहे. परंतु, ते शक्य होत नाही. काहींना सरकार येईल अशी स्वप्नं पडत आहेत. परंतु, हे आघाडी सरकार ५ वर्षे पूर्ण करेल. परंतु, तेवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार २५ वर्ष टिकेल. म्हणून २५ वर्ष स्वप्न बघतच राहा असा सल्ला देखील नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज (गुरुवार) माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सगळे झोपेतअसतानाच सरकार पडेल. कुणाला कळणारही नाही, असे ते म्हणाले, पुढे पाटील म्हणाले. राज्य सरकार जसं कधी आलं ते कुणालं कळलं नाही तसं ते गेलं कसं हेही कुणाला कळणार नाही. तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या मिळालेला सत्तेचा काळ हा बोनस आहे. त्यांनी स्वतःच काही दिवसांपूर्वीच सरकार जाणार असल्याची मनाची तयारी करून घेतली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Also Read This : 

 

एका व्यक्तीला व्हॅक्सीनचे वेगवेगळ डोस देण्याचं प्रकरण, जाणून घ्या आरोग्य मंत्रालयानं काय सांगितलं

 

‘महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…’

 

दारूबंदी बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय, जाणून घ्या