Nawab Malik | केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सुडबुद्धीने कारवाई, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने केंद्रीय तपास यंत्रणांना (Central Investigation Agency) हाताशी धरून सूडबुद्धीने अनेकांवर कारवाई केली जात आहे. सरकारच्या स्थापनेपासून भाजपकडून हेतुपुरस्सर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी व खोटे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचे कटकारस्थान सुरू असून यां सर्व यंत्रणांना उघडे पडण्याचे काम पवार साहेबांचा शिलेदार म्हणून मी पार पाडली, असे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले.पुण्यातील एका कार्यक्रमात नवाब मलिक (Nawab Malik) बोलत होते.

 

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP) वतीने राज्याचे अल्पसंख्याक विकास तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या वतीने आझम कॅम्पसमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, नवाब मलिक आक्रमक भूमिका घेत भाजपला सडेतोड उत्तर देत आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना यामुळे लढण्याची ऊर्जा मिळत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे (Sanjay More),
गजानन थरकुडे, पुणे शहर काँगेस (आय.) अध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe), काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड (Abhay Chhajed),
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर (Balasaheb Shivarkar), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre),
आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe), जेष्ठ नेते अंकुश काकडे (Ankush Kakade), विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal),
प्रवक्ते प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh), समिर शेख, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Nawab Malik | Nawab Malik’s attack on BJP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PMSYM Scheme | प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ! दररोज 2 रुपयांची बचत देईल सोनेरी भविष्य, दरवर्षी मिळवा 36000 रुपये

Nawab Malik In Pune | आम्ही आता गप्प बसणार नाही, ‘भाजप नेते कोणाला तोंड दाखवू शकणार नाहीत’ ! लवकरच ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार; नवाब मलिक यांचा इशारा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 47 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bigg Boss 15 | राखीचा पती रितेशने केलं तेजस्वी प्रकाश सोबत ‘असं’ काही की तेजस्वी म्हणाली, ‘तरी सुद्धा हे लोक संस्कारांबद्दल बोलतात..’