Nawab Malik | नवाब मलिकांना तुरूंगात ‘बेड’ आणि ‘खुर्ची’ची मुभा, मात्र मुक्काम आणखी वाढला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली असून 4 एप्रिलपर्यंत त्यांचा मुक्काम असणार आहे. आता मलिकांना 23 मार्चला अटक (Arrested) होऊन एक महिना पुर्ण होणार आहे मात्र अद्यापही त्यांना कोर्टाकडून (Court) कोणताही दिलासा मिळालेला नाही.

 

नवाब मलिक यांना आता कोठडीमध्ये बेड (Bed), खुर्ची आणि चटई (Chair & Mat) वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना पाठीचा त्रास (Back Pain) असल्याने न्यायालयाने यासाठी परवानगी दिली आहे. नवाब मलिकांच्या अटकेला जवळपास 1 महिना होणार आहे. 23 फेब्रुवारीला नवाब मलिकांना (Nawab Malik) अटक झाली होती. त्यानंतर त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर 3 तारखेला झालेल्या सुनावणीत 21 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली होती.

 

21 मार्चला कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
मात्र कोर्टाने त्यांना जामीन (Bail) देण्यास नकार कळवला आणि मलिक यांना 4 एप्रिलपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
नवाब मलिक यांचा राजीनामा अद्याप राष्ट्रवादीने (NCP) दिला नाही. मलिकांची पाठराखण करत त्यांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलं असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं.

 

दरम्यान, नवाब मलिक यांना जोपर्यंत न्याय (Justice) मिळत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्था उभी करणार आहोत.
मलिक हे बिनखात्याचे मंत्री असणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

 

Web Title :- Nawab Malik | NCP leader nawab maliks remand extended till april 4 no relief from court in mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा