NCB Officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंना मोठा दिलासा ! एनसीबीनं घेतला महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंवर (NCB Officer Sameer Wankhede) आर्यन खानच्या (Aryan Khan) सुटकेसाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. एनसीबीने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत तत्काळ समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांची खात्या अंतर्गत चौकशी सुरु केली आहे. बुधवारी दिल्लीहून आलेल्या एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंह (ncb deputy director general gyaneshwar singh) यांच्या नेतृत्त्वाखाली पाच अधिकाऱ्यांनी समीर यांची चौकशी केली. दरम्यान, वानखेडे यांना एनसीबीने मोठा दिलासा दिला आहे. एनसीबीने क्रूझ शिप ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास वानखेडेंकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. वानखेडे यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळेपर्यंत तेच या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे एनसीबीने म्हंटले आहे.

Pune Smart City | स्मार्ट सिटी योजना ! नावलौकीक मोदींचे पैसा पुणेकरांचा – माजी आमदार मोहन जोशी

एनसीबीच्या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल (prabhakar sail) यांनी धक्कादायक खुलासा केला होता. एनसीबीच्या कारवाईवेळी खासगी हेर के. पी. गोसावी उपस्थित होते. साईल हे गोसावी (Kiran Gosavi) यांचे अंगरक्षक आहेत. शाहरूख खानकडून (shah rukh khan) २५ कोटींची मागणी करण्यात यावी. १८ कोटींपर्यंत सेटलमेंट करावी आणि त्यातले ८ कोटी समीर वानखेडेंना (NCB Officer Sameer Wankhede) द्यावी, असे गोसावी फोनवर बोलत होते ते संभाषण ऐकल्याचा दावा साईल यांनी केला आहे. साईल यांच्या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यामुळे वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी सुरु झाली. दरम्यान, ही चौकशी पूर्ण होईपर्यंत वानखेडेंची मुंबईबाहेर बदली करण्यात येईल. त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात येईल, अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र एनसीबीनं या प्रकरणाचा तपास वानखेडेंकडेच ठेवला आहे.

यासंदर्भात बोलताना एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, समीर वानखेडे यांची चौकशी सुरु असून त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत तेच क्रूझ शिप ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करतील.
या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे वानखेडे यांनी जमा केले आहेत.
गरज भासल्यास त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येईल.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील वानखेडेंवर खंडणी,
अवैध फोन टॅपिंग आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीमध्ये वाढ, जाणून घ्या आजचे भाव

Pune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ! महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : NCB Officer Sameer Wankhede | NCB Officer Sameer Wankhede head aryan khan case unless clears ncb deputy director general gyaneshwar singh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update