NCP Chief Sharad Pawar | गावबंदीमुळे अजितदादांनी माळेगाव कारखान्यात जाणे टाळले, शरद पवार म्हणाले – ‘योग्य निर्णय…’

मुंबई : NCP Chief Sharad Pawar | माळेगाव साखर कारखानाच्या (Malegaon Sugar Factory) गळीप हंगामाची सुरूवात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) हस्ते मोळीपूजनाने होणार होती. मात्र, मराठा समाजाने यास विरोध केल्यानंतर कारखाना परिसरात तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती, अखेर अजित पवारांनी माघार घेत कार्यक्रमाला जाणे टाळले आणि शेतकऱ्यांच्या हस्ते मोळी पूजन करण्यास सांगितले. अजित पवारांच्या या निर्णयावर आता ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय योग्य असल्याचे ते म्हणाले.

शरद पवार यांनी म्हटले की, लोकांच्या मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काही भावना असतील तर अशावेळी तिथे संघर्ष टाळणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. माझ्या मते, अजित पवारांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे.

दरम्यान, अजित पवारांना केलेल्या गावबंदीवर बोलताना मराठा आंदोलकांनी म्हटले की, आमचा विरोध अजित पवारांना नाही, तर ६ राजकीय पक्ष आणि सर्व नेत्यांना आहे. २०१७ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षणप्रश्नी त्यांना अडवले होते. ६ वर्षांनी अजित पवारांना अडवण्याची वेळ आमच्यावर राजकारण्यांनी आणली. सध्या आमचा एकच नेता मनोज जरांगे आहे. ते जे सांगतील ती भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार.

मराठा क्रांती मोर्चाने प्रतिक्रिया देताना म्हटले, अजित पवार असो वा अन्य राजकीय नेते कुणालाही राजकीय कार्यक्रम
घेऊन देणार नाही. मराठा समाजाच्या भावनाचा आदर राखावा. तरीही नेत्यांनी प्रवेश केला तर कारखान्यावर भगवे
वादळ पाहायला मिळेल. या नेत्यांना पाऊल ठेऊ देणार नाही. मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) पाठिंबा म्हणून आम्ही आंदोलन करतोय. (NCP Chief Sharad Pawar)

आंदोलकांनी म्हटले, महिला, ज्येष्ठ, तरूण सगळेच आंदोलनात सहभागी झालेत. यावर जर दडपशाही करून
आंदोलकांवर गाड्या घालायच्या असतील तर ते अजित पवारांनी ठरवावे. आमचे आंदोलन पूर्ण शांततेत असेल.

मराठा आंदोलकांनी म्हटले, मराठा समाज म्हणून आमच्या वाट्याला निराशाच येते. १ लाख ६५ हजार मताधिक्यामध्ये मराठा समाजाचे योगदान नाही का? आम्ही अजित पवारांना मतदान केले. मग आमचे चुकतंय कुठे? सगळ्या नेत्यांमागे
समाज उभा राहतो.

आंदोलकांनी पुढे म्हटले की, मतदानात वापर करतात. ओबीसीतून ५० टक्क्यातून आरक्षण द्या अशी मागणी आहे.
मराठा समाजाला भूलथापा देऊन वेळ काढू भूमिका असेल तर समाज जागरुक झाला आहे.
कोणत्याही नेत्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sassoon Drug Case | पुणे: ससून ड्रग रॅकेट प्रकरणांत विधानपरिषद उप सभापती व 7 आमदारांची चुप्पी शहरासाठी धोक्याची घंटा !

NCP Chief Sharad Pawar On PM Narendra Modi | PM मोदींना आता थेट शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर, कृषिमंत्री असताना काय केले? भलीमोठी यादीच वाचली!