NCP Chief Sharad Pawar | पंतप्रधानांवर शरद पवारांची जोरदार टीका, ”मोदी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी उपवास…”

Sharad Pawar On Narendra Modi | satara lok sabha election reducing the power of narendra modi is the need of the country ncp sharad pawar

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – NCP Chief Sharad Pawar | राम मंदिराच्या (Ram Mandir) कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? मोदी दहा दिवस उपवास करत आहेत. तसाच उपवास देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केला आहे. ते एका मेळाव्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान, व्रताचरण, उपवास करत आहेत. यावरून पवारांनी ही टीका केली.

शरद पवार म्हणाले, अयोध्येचे श्रीराम, हनुमान याबद्दल आदर आहे.
मशीद पडल्यानंतर राम मंदिर बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळेस झाला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला.
राम मंदिराचे काम राहिले बाजूला, मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा घेत आहेत.

केंद्र सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले, या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही.
देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात, पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही.
देशात चुकीची आर्थिक धोरणं राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणं राबवत असलेल्यांना बाजूला केले पाहिजे.
कर्नाटकातील निकाल विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे.
केंद्र सरकार धार्मिक प्रश्नावर लोकांची मने वळवण्याचा प्रयत्न करतेय.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

न्याती कंपनीच्या ध्यान मंदिराच्या घुमटावरुन पडून कामगाराचा मृत्यू, कॉन्ट्रॅक्टरवर FIR

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ”सरकारकडून माझ्यावर डाव, मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि…”

PCMC Water Supply | पिंपरी चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Total
0
Shares
Related Posts
Sonia Gandhi Birthday | Inauguration of Service, Duty and Sacrifice Week by Prithviraj Chavan on the occasion of Sonia Gandhi's birthday; Former Chief Minister said - 'Sonia Gandhi a visionary leader'

Sonia Gandhi Birthday | सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन; माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘सोनिया गांधी दूरदृष्टीच्या नेत्या’