NCP Chief Sharad Pawar | ‘मी म्हटलं, कुसुम काय चाललंय? तिचा चेहरा फुलला’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ फॉर्म्युला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची स्मरणशक्ती (Memory) आणि या 81 व्या वयातही त्यांच्यातील स्फूर्ती (Inspiration) ही सर्वांच्या आश्चर्याचा विषय आहे. या वयात देखील स्मरणशक्ती एवढी तल्लख कशी, असा प्रश्न आज त्यांना विचारण्यात आला. याबाबत बोलताना शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) एक किस्सा सांगितला. ते जनतेशी कशाप्रकारे संपर्कात राहतात याचा फॉर्म्युला त्यांनी या माध्यमातून सांगितले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी पुण्यात ‘कनेक्ट महाराष्ट्र कॉनक्लेव्ह’ (Connect Maharashtra Conclave) हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या स्मरणशक्ती बाबत प्रश्न विचारण्यात आला.

 

शरद पवार म्हणाले, मला दोन लोकांबरोबर अतिशय लहान वयात काम करण्याची संधी मिळाली. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) आणि वसंतदादा पाटील (Vasantdada Patil), या दोन लोकांचं वैशिष्ट्य असं होतं, की कुणीही 50 वर्षापूर्वीचा त्यांचा जोडीदार त्यांना भेटला तर ते त्यांना पहिल्या नावाने हाक मारायचे. मी बघितलं होतं, त्यांचं राजकारण यशस्वी व्हायला अनेक गोष्टी जमेच्या बाजू आहेत. पण, पहिलं नाव घेऊन ते सुसंवाद ठेवायचे, त्यात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळायचा. त्यावर माझंही लक्ष असायचं.

 

मी मुख्यमंत्री (CM) होते, तेव्हा माझ्या मतदार संघातील एक भगिनी काही कामासाठी भेटायला आली.
ती आल्यानंतर तिला बस म्हटलं आणि विचारलं ‘काय कुसुम काय चाललंय?’ काय कुसुम विचारल्यावर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता,
त्यात ती ज्या कामासाठी आलेली ते कामच विसली आणि गावात जाऊन सांगायची की,
माझ काम होवो न होवो… पण साहेबांनी मला कुसुम म्हणून हाक मारली.
लोकांशी व्यक्तीगत संबंध, व्यक्तीगत नाव ही स्मरणशक्ती जर आपण कंटिन्यू केली तर आपल्याला प्रचंड उपयुक्तता होते.
एक काळ असा होता की माझ्या मतदार संघातील 50 टक्के लोकांना मी पहिल्या नावाने ओळखायचो.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar shared a memory of calling people by their first name in connect maharashtra conclave

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO सदस्यांनी ऑनलाइन कसे करावे नॉन-रिफंडेबल अ‍ॅडव्हान्ससाठी अप्लाय, काढू शकता 75 टक्के रक्कम

 

Pune Pimpri Crime | पोलीस अन् कारचोरांचा महामार्गावर ‘थरार’, चोरट्यांकडून पोलिसावर चाकूने वार

 

Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? उलट सुलट बोलतात त्यावर मी का उत्तर देऊ; फडणवीस यांनी साधला निशाणा