NCP Chief Sharad Pawar | खा. गिरीश बापटांनी दिला शरद पवारांना शब्द, म्हणाले – ‘मी आता बरा आहे, लवकरच परत येईन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या 20 ते 25 दिवसांपासून बापट यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सोमवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन बापट यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यांनी बापट यांच्याशी संवाद देखील साधला. यावेळी गिरीश बापट यांनी मी आता बरा असून लवकरच परत येईल असे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना सांगितले.

 

काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून गिरीश बापट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीमध्ये म्हणावी तशी सुधारणा होत नाही. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना त्यांची चिंता वाटू लागली आहे. म्हणूनच शरद पवार यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन बापट यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारणा केली.

 

 

शरद पवार भेटण्यासाठी आले असता, तुम्ही जास्त बोलू नका, आराम करा, असा सल्ला त्यांनी दिला.
बापट यांना श्वसनाचा त्रास असल्या कारणाने, तुम्हाला जास्त बोलता येत नाही,
किती महिन्यापासून हा आजार सुरु आहे? अशी एकूण प्रकृती बाबत विचारणा शरद पवार यांनी केली.

शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश बापट म्हणाले,
मी गेल्या दोन महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात गेलो होतो. तेव्हापासून मला आजार सुरु झाला.
मी बरा होईन, लवकरच कामाला लागेल. अशी चर्चा या दोन नेत्यांमध्ये झाली.
अशी माहिती शरद पवार यांच्यासोबत गेलेले प्रवीण गायकवाड यांनी दिली.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar visits bjp mp girish bapat at dinanath mangeshkar hospital pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स