NCP Chief Sharad Pawar | जाहिरात वादावर शरद पवारांचा भाजप-शिंदे गटाला खोचक टोला, म्हणाले-‘ऐतिहासिक काम झाले…’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाकडून (Shinde Group) ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात देऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर भाजप (BJP)-शिंदे गटाच्या कार्यकर्ते-नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या जाहिरात वादावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना खोचक शब्दात टोला लगावला. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, आम्हालाही हे आत्ताच कळलं. महाराष्ट्राचे हे भाग्य आहे. अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दल नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज असा होता की, हे जे सरकार बनले आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळे आम्हा लोकांच्या मनात भर पडली की, भाजपचे यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांचे आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचे ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या (Advertising) माध्यमातून झाले आहे. याबद्दल त्यांना धन्यवाद, अशा खोचक शब्दात पवार यांनी भाजप-शिंदे गटाला कानपिचक्या दिल्या.

वंचित बहुजन आघाडी बी टीम

या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेनेत (Shivsena) कलगीतुरा रंगल्यानंतर शिंदे गटाने दुसऱ्या दिवशी पुन्हा जाहिरात देत खुलासा दिला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, एवढ्या मोठ्या जाहिराती सर्व पेपरला दिल्या आहेत. ही लाभदायक गोष्ट ठरली आहे. दुसरीकडे, पवार यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. वंचित पायात पाय घालण्यासाठी तयार केलेली बी टीम आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांची यादी वाचली

देशभरातील भाजपाच्या निवडणुकीतील यशावर बोलताना शरद पवार म्हणाले, आज केरळमध्ये भाजप नाही.
शेजारी तामिळनाडूतही भाजप नाही. कर्नाटकमध्ये आत्ता निवडणुका झाल्या, तिथेही भाजप सत्तेत नाही.
तेलंगणा, उडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालमध्येही भाजप नाही.
मग भाजप आहे तरी कुठे, सध्या भाजप उत्तर प्रदेशात आहे कबुल करावं लागेल.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | sharad pawar first reaction on popular cm advertisement dispute between bjp shinde faction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | अट्टल गुन्हेगार विवेक यादव याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

Data Hack By Android Apps | अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांचा डेटा होतोय चोरी; ‘हे’ ॲप्स लगेचच करा डिलीट

Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा दणका, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश