NCP Chief Sharad Pawar | ‘कदाचित तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे… ‘ ‘त्या’ विधानावरुन शरद पवारांची खोचक टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात टोलेबाजी सुरु असताना दुसरीकडे फडणवीस यांनी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा (Maharashtra Politics News) सुरु आहे. चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या (Modi Government) 9 वर्षापूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत 1978 च्या घडामोडीचा संदर्भ दिला. फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना (NCP Chief Sharad Pawar) लक्ष्य करताना 1977 साली स्थापन केलेल्या सरकारचा संदर्भ दिला. 1978 मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार (MLA) घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी त्यावेळच्या भाजपाबरोबर (BJP) सरकार स्थापन केले. ते सरकार दोन वर्षे चालले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी (PM Indira Gandhi) ते सरकार बरखास्त केले नसते तर ते सरकार पाच वर्षे चालले असते. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केले ते ‘मुत्सेद्देगिरी’ आणि तेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले तर गद्दारी? असं कसं चालेल? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

तेव्हा फडणवीस लहान असतील

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला. मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगावे. 1977 साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील (DyCM Uttamrao Patil) उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते, असे शरद पवार म्हणाले.

अज्ञानापोटी असं वक्तव्य

शरद पवार पुढे म्हणाले, मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत (Primary School) असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत. यापेक्षा काही फारसं भाष्य करण्याची आवश्यकता नाही, असा टोला त्यांनी लगावला.

फडणवीसांचे वाचन किती मला माहित नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसींना (OBC) फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी
केली होती. यावर माध्यमांनी विचारलं असता शरद पवार म्हणाले, हेही फडणवीसांचं अज्ञानच आहे.
राष्ट्रवादीचे पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) होते. त्यानंतर पिचड, सुनील तटकरे (Sunil Tatkare) होते. हे सगळे कोण आहेत? ही सगळी यादी बघा. अर्थात त्यांचं वाचन किती आहे ते मला माहिती नाही. या सगळ्या गोष्टींची नोंद न घेता ते विधानं करतात. ठीक आहे, लोकांना माहिती असतं. त्यांचा प्रश्न वास्तवाला धरून नसल्याचे शरद पवार म्हणाले.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | sharad pawar mocks devendra fadnavis on 1978 government formation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा