NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा, ”राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे न्यायाने पाहत नसतील तर…”

नाशिक : NCP Chief Sharad Pawar | राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे न्यायाने पाहात नसतील तर सामुदायिक शक्ती दाखवावीच लागेल. हे नाशिक करु शकतं. कारण नाशिकने या देशात सामूहिक शक्ती उभी करण्यासाठी वेगळा कार्यक्रम राबवला. वेगळे नेते ज्यांनी तयार केले त्यात नाशिकचे नाव घ्यावे लागते. शरद जोशी हे नेते आहेत. त्यांनी नाशिकशी संपर्क ठेवला. सामुदायिक शक्ती उभी करुन शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवली. त्यानंतर अनेक आंदोलने देशात झाली, असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मोदी सरकारला (Modi Government) इशारा दिला आहे. ते नाशिकमधील चांदवड येथील सभेत बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलानाला नाशिकने कायमच पाठिंबा दिला आहे हा इतिहास आहे. उद्या मी दिल्लीला जाणार आहे. संसदेत तुमचे म्हणणे मांडेन. सगळे करुन सरकार बघ्याचीच भूमिका घेणार असेल तर तुम्ही आंदोलनासाठी तयार राहा. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावाच लागेल.

(Sharad Pawar) शरद पवार म्हणाले, कांदा हे जिराईत पीक आहे. कांदा पीकात दोन पैसे मिळतात पण त्यासाठी शेतकरी कष्ट करतात. मात्र ज्यांच्या हातात देशाचे धोरण आहे त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा असे वाटत नाही. सरकारमधील लोकांना जर शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, २०१० नंतरची गोष्ट आहे, कांद्यांच्या किंमती वाढल्या म्हणून भाजपावाल्यांनी दंगा केला होता. दुसऱ्या दिवशी लोकसभेत ते कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले. त्यावेळी स्पीकर त्यांना रागावले. हे काय चालले आहे असे विचारले. कांद्याचे भाव इतके वाढले आहेत की ते खाणे कठीण झाले आहे. अध्यक्षांनी मला विचारले की सरकारचे धोरण काय? कांद्यांच्या किंमती खाली आणता येतील का? त्यावर मी उत्तर दिले कांदा उत्पादक हा लहान शेतकरी आहे. त्याला जर बरे पैसे मिळत असतील इतर इतका दंगा करण्याचे कारण नाही.

(Sharad Pawar) शरद पवार म्हणाले, रोजच्या अन्नात तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मसाला यांचा खर्च काढला आणि कांद्याचा खर्च
काढला तर तो किती असा आहे? असा प्रश्न विचारला. कांद्याच्या माळा घाला नाही तर काहीही करा, निर्यात बंदी होणार
नाही अशी भूमिका मी त्यावेळी घेतली होती. कांदा महाग झाला म्हणत आहेत. खाना मुश्किल हो गया है म्हणतात.
कोण म्हणते कांदा खा? नका खाऊ.

शरद पवार म्हणाले, कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे.
त्यामुळे कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतलाच पाहिजे. आम्ही रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत दिल्लीला कळत नाही.

शरद पवार म्हणाले, राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखणारे नाहीत. २६ नोव्हेंबरला अवकाळी पाऊस
आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, द्राक्ष उत्पादकांचा माल खराब झाला. त्यामुळे शेतकरी संकटात आला.
तरीही सरकारने मदत केलेली नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | साहू प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपावरही भ्रष्टाचाराचा आरोप, नाव घेतल्याने प्रसाद लाड संतापले

Uddhav Thackeray | दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा, ”…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”

BJP MLA Prasad Lad | काळापैशाचा आरोप केल्याने भाजपा आमदार प्रसाद लाड संतापले, संजय राऊतांना केली शिवीगाळ, म्हणाले…

CM Eknath Shinde | ”सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ”, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन