NCP Chief Sharad Pawar Withdraw His Resignation | शरद पवारच गॉडफादर! त्यांनी राजीनामा मागे घेतला, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहणार (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar Withdrew His Resignation | ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कुठंतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सर्वांना एकच धक्का बसला. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना वेगवेगळया मार्गाने राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती केली होती. दरम्यान, आज शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला असून तेच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत.
VIDEO | "I have decided to withdraw my decision to quit as NCP President," says @PawarSpeaks at a press conference in Mumbai. #SharadPawar pic.twitter.com/3cBfDvpm6Q
— Press Trust of India (@PTI_News) May 5, 2023
गेल्या दोन दिवसांपासुन घडत असलेल्या नाटयमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली
आणि त्यामध्ये आपण राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एकमताने ठराव केला होता. शरद पवार यांची देशाला, राज्याला आणि पक्षाला गरज असल्याने त्यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहावे अशी भावना सर्वांनी व्यक्त केली होती.
Sharad Pawar takes back his resignation as the national president of NCP.
"I'm taking my decision back," he announces in a press conference. pic.twitter.com/DM9yGPv6CE
— ANI (@ANI) May 5, 2023
अनेक नाटयमय घडामोडी घडल्यानंतर अखेर शरद पवार यांनी आज त्यांचा राजीनामा मागे घेतला आहे.
Web Title :- NCP Chief Sharad Pawar Withdrew His Resignation | Sharad Pawar takes back his resignation as the national president of NCP
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Journalist Amol Kavitkar | भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख’पदी अमोल