NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही, राज्यपालांनी गुणात्मक बदल केलाय’, शरद पवारांचा राज्यपालांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे (Shivsena Rebel MLA Leader Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सर्वच आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईत येऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची ही भेट घेतली. यावेळी राज्यापालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच दोन्ही नेत्यांना पेढा ही भरविला. पेढा भरतवातानाचे फोटो व्हायरल झाले. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राज्यपालांवर निशाणा साधाल आहे. ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही, राज्यपालांनी गुणात्मक बदल केलाय’ अशा शब्दात शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राज्यपालांना टोला लगावला.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवला होता.
यावरुन शरद पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. जवळपास 1990 सालापर्यंत मी वेगवेगळ्या पदावर शपथा घेतल्या आहेत.
पण आजपर्यंत मला कुठल्याही राज्यापालांनी पेढा भरवला नाही. यापूर्वी, ज्यांनी शपथ घेतली, त्यांना फुलांचा गुच्छही देताना मी पाहिलं नाही.
यावेळी त्यांनी दिला याचा आनंद आहे. राज्यपालांनी गुणात्मक बदल केलाय, असे म्हणत शरद पवार यांनी राज्यपालांना चिमटा काढला.

 

दरम्यान, सभागृहात गेल्यानंतर बंडखोर आमदारांचे मत परिवर्तन होईल, असा काहींसा विश्वास आहे,
असे म्हणत शरद पवार यांनी बहुमत चाचणीबाबत (Majority Test) सूचक विधान केलं आहे.
तर आम्ही बहुमत सहजच सिद्ध करु असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | yet i have not got sweet by any governor ncp chief sharad pawar said on bhagatsingh koshyari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

 

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयचे वक्तव्य, बँकांना दिले हे महत्वाचे निर्देश