राष्ट्रवादीच्या ‘त्या’ बडतर्फ १८ नगरसेवकांची घरवापसी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर मनपा निवडणूकीत पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याने पक्षातून बडतर्फ केलेल्या १८ नगरसेवकांना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्यात आले आहे. सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नगर दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी हे नगरसेवक सहभागी झाले होते. आज झालेल्या मेळाव्यात त्यांची बडतर्फी मागे घेण्यात आल्याचे घोषणा जयंत पाटील यांनी केली.

अहमदनगरच्या मनपा निवडणूकीत भाजपला १४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महापौर निवडणूकीत बाबासाहेब वाकळे यांना राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी मतदान केले होते. तर बसपच्याही ४ नगरसेवकांनी याला हातभार लावला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनपातील गटनेते बारस्कर यांच्यासहब १८ नगरसेवक आणि शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली होती.

त्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे :

१.      सागर बोरुडे

२.      मीनाक्षी चव्हाण

३.      दीपाली बारस्कर

४.      संपत बारस्कार

५.      विनीत पाउलबुद्धे

६.      सुनील त्रंबके

७.      खान समद वहाब

८.      ज्याती गाडे

९.      शोभा बोरकर

१०.  कुमार वाकळे

११.  रुपाली पारगे

१२.  अविनाश घुले

१३.  गणेश भोसले

१४.  परवीन कुरेशी

१५.  शेख नजीर अहमद

१६.  प्रकाश भागानगरे

१७.  शीतल जगताप

१८. मीना चोपडा