NCP Crisis-Election Commission | अजित पवार गटाने दिली मृत व्यक्तींची शपथपत्र; शरद पवार गटाकडून खळबळजनक दावा, उद्यापासून सुनावणी सुरु

पोलीसनामा ऑनलाइन – NCP Crisis-Election Commission | अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाकडून पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा करण्यात आला. तर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून सर्व दावे फेटाळण्यात आले आहे. राष्ट्रावादी पक्षाचे नाव आणि चिन्ह नक्की शरद पवार गटाचे की अजित पवार गटाचे (Ajit Pawar) या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादीची ही कायदेशीर लढाई आता सुरु झाली असून उद्या (दि.06) निवडणूक आय़ोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी पक्षाच्या प्रकरणाची सुनावणी होणार असून शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तब्बल आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार गटातील शपथपत्रांपेक्षा ही संख्या जास्त असून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी पक्षासाठी दोन गटामध्ये कायदेशीर लढाई होताना दिसणार आहे. (NCP Crisis-Election Commission)

राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या चिन्हाबाबत उद्यापासून निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु होणार आहे. शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील लढाई संपूर्ण राज्याने पाहिली असून आता राष्ट्रवादी बाबत देखील अशीच सुनावणी होणार आहे. दोन्ही गट निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या पहिल्या सुनावणीसाठी सज्ज झाले असून कागदपत्रे सादर केली आहेत. शरद पवार गटाने देखील जोरदार तयारी केली असून या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक देखील दिल्लीमधील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणार आहे. या कार्य समितीच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवण्यात आले किंवा जर विरोधात निर्णय आला तर पुढे काय विपरीत परिणाम होणार? आणि भविष्यात नेमके कोणते पाऊल उचलायचे अशा मुद्द्य़ावर चर्चा होणार आहे. (NCP Crisis-Election Commission)

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर 8 ते 9 हजार शपथपत्रे दाखल करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून असा दावा करण्यात आला आहे की, अजित पवार गटापेक्षा त्यांच्या कागदपत्रांची संख्या जास्त आहे. अजित पवार गटाकडून जी कागदपत्र दाखल करण्यात आली आहेत त्या कागदपत्रांमध्ये काही दोष सुद्धा आहेत. हे दोष निवडणूक आयोगाला दाखवण्यात देखील येणार आहेत. अजित पवार गटाच्या कागदपत्रांमध्ये काही मृत व्यक्तींच्या नावे ही शपथपत्र दाखल केली गेली आहेत.

तर काही शिक्षण संस्थांचे कर्मचारी आहेत की जे सरकारी नोकरीला आहेत त्यांचे सुद्धा शपथपत्र दाखल करण्यात आले
असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. कारवाईमध्ये यासंदर्भामध्ये शपद पवार गट आपली बाजू
मांडून या गोष्टी निदर्शनास आणणार आहेत. उद्या पार पडणाऱ्या या सुनावणीवेळी अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार
गटाची बाजू मांडणार आहेत. यावेळी नेत्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. प्रमुख पहिल्या फळीतील नेते
नसले तरी सुनवाणीवेळी दुसऱ्या फळीतील नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष आता राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्ग तब्बल 5 दिवस बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणता?

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिंदे गटाने ठाकरेंना डिवचलं, मातोश्री बाहेर बॅनरबाजी