NCP Crisis | शरद पवार गटाची जबरदस्त राजकीय खेळी; जयंत पाटलांनी घेतली सुप्रिम कोर्टात धाव

पोलीसनामा ऑनलाइन – NCP Crisis | राष्ट्रवादीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) य़ांनी बंड केल्यामुळे उभी फूट पडली आहे. अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट निर्माण झाले असून अजित पवार गटाने पक्षावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या नावाबाबत व चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर आज (दि.06) सुनावणी पार पडली. मात्र सुनावणीपूर्वी शरद पवार गटाकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. यामुळे अजित पवार गटामध्ये सामील झालेल्या बंडखोर नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सुप्रिम कोर्टामध्ये (Supreme Court) धाव घेतली आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सुप्रिम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे. (NCP Crisis)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वी अजित पवारांसोबत बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधामध्ये निलंबनाची याचिका दाखल केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाकडून देखील रोहित पवार व जयंत पाटील यांच्यासह 10 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप राष्ट्रावादीने दाखल केलेल्या या याचिकेवर कोणतीही सुनावणी सुरु केलेली नाही. त्यामुळे पक्षाच्या नावाच्या व चिन्हाच्या आयोगापुढील सुनावणीपूर्वीच जयंत पाटील यांनी सुप्रिम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 9 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे. (NCP Crisis)

राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला असून शरद पवार गटाने सर्व दावे फेटाळले आहेत.
या संदर्भात निवडणूक आयोगासमोर आज पहिली सुनावणी पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
स्वतः उपस्थित राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि व्हीप म्हणून जितेंद्र आव्हाड
यांच्याकडून विधानसभेच्या 41 आमदारांविरोधात निलंबनाच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
या याचिका तीन टप्प्यांमध्ये सादर करण्यात आल्या असून पहिल्यांदा अजित पवारांसह 9 आमदार, नंतर विधानसभेचे
20 आमदार, विधानपरिषदेचे 4 आमदार, यानंतर विधानसभेचे 12 आमदार अशा तीन टप्प्यात या निलंबन याचिका सादर करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणून जयंत पाटलांनी सुप्रिम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेबाबत सुनावणीला दिरंगाई केल्यामुळे फटकारले होते. आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून देखील सुप्रिम कोर्टामध्ये धाव घेण्यात आली आहे. ही शरद पवार आणि राष्ट्रवादीची जबरदस्त खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrikant Shinde On Aaditya Thackeray | जेलचं कोणाला सांगता, कंपनी स्थापन होण्याअगोदर तुम्ही टेंडर दिले