पंकजा मुंडेंच्या टीकेला धनंजय मुंडेंचे उत्तर; म्हणाले – ‘ताईसाहेब…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे असे म्हटले होते. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी यावर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘ताईसाहेब, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा’.

पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यात रेमडेसिव्हिर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाल्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल’.

तसेच कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे, आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये?

 

 

 

 

 

 

जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरिकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा, पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको, असेही त्यांनी म्हटले आहे.