NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan | अमोल मिटकरींचा रावण दहन प्रथेवर आक्षेप; हिवाळी अधिवेशनात करणार ‘ही’ मोठी मागणी

अकोला : NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील (Ajit Pawar) आमदार अमोल मिटकरी यांनी रावण दहन प्रथेवर आक्षेप घेतला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात आपण मागणी करणार आहोत, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. मिटकरी यांनी अकोल्यातील पातूर तालुक्यातील सांगोळा येथील एकमेव रावण मंदिराच्या धर्म सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले आहेत. (NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan)

याबाबत माहिती देताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राजकीय नेत्याच्या पुतळ्याचे दहन करण्यासाठी पोलीस परवानगी लागते. रावण हा राक्षसांचा राजा होता. अनेक ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत. सांगोळा गावात रावणाची मूर्ती आहे. दसऱ्याच्या दिवशी येथील लोक रावणाचे दहन करत नाहीत. (NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan)

मिटकरी यांनी म्हटले, आदिवासी लोक रावणाची मनोभावे पूजा करतात. आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे. त्यामुळे त्याची दैवते ही प्रत्येकाची दैवते असतात. त्यामुळे रावण दहन करणाऱ्याच्या अंगी रामाचे गुण असावेत. रावण चरित्र्य, प्रखांड पंडित, शिवभक्त आणि अभ्यासू होता.

(NCP MLA Amol Mitkari ) मिटकरी म्हणाले, येत्या हिवाळी अधिवेशनात मी स्वत: रावण दहनाविरोधात शासन निर्णय व्हावा, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यासमोर मांडणार आहे. कुणीही रावण दहन करू नये. आदिवासी समाजाच्या दैवताचा अपमान हा एकप्रकारे आदिवासी समाजाचा अपमान आहे. त्यामुळे या प्रथेला कायम निर्बंध घातले पाहिजेत, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

मिटकरी यांनी पुढे म्हटले की, भारतभर रावणाची अनेक ठिकाणी पूजा होते. रावणाने कधी कुणाला त्रास दिला नाही.
दुर्दैवाने अनेक कथा रंगवल्या जातात. महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आमच्या जिल्ह्यात आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे.

मिटकरी म्हणाले, राजकीय नेत्यांचे पुतळे जाळले तरी गुन्हा दाखल होतो, पण रावण हा लंकेचा राजा होता.
शिवभक्ताचा पुतळा जाळण्यामागे उद्देश काही लोकांचा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा असतो.
आम्ही रामाची पूजा करतो मग रावणाचे दहन कशाला?

मिटकरी म्हणाले, आदिवासी लोकांची भावना तीच माझी भावना आहे.
रावण दहन करणारा जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी.
रावण दहन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी त्यासाठी अधिकृत शासन निर्णय व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case-Drug Mafia Lalit Patil | ड्रग्जप्रकरणात राजकीय नेत्यांचा रंगला ‘फोटो-फोटो’चा खेळ, आता आव्हाडांनी CM शिंदेंचा ‘तो’ फोटो दाखवला

Pune Court On Police Inspector | पोलीस निरीक्षकाला अटक करुन न्यायालयात हजर करा, शिवाजीनगर न्यायालयाचे आदेश