NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणात केतकी चितळेची उडी, आणखी ‘ही’ कलमं वाढवा अन्यथा…

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना अटक (Arrest) केल्यानंतर आता या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेने (Actress Ketaki Chitale) उडी घेतली आहे. केतकीच्या वतीने वर्तक नगर पोलीस ठाण्याला (Vartak Nagar Police Station) एक नोटीस पाठवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्यावर लावण्यात आलेली कलमे पुरेशी नसून अजून कलमे त्यात वाढवण्यात यावीत अशी मागणी, केतकी चितळे हिने आपल्या नोटीसमधून केली आहे.

 

ADV

ठाण्यातील मॉलमध्ये हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाच्या शो दरम्यान झालेल्या गोंधळा प्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना आज (शुक्रवारी) ताब्यात घेत अटक केली. त्यांनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांच्या या कारवाईवर संताप व्यक्त केला. त्यातच आता केतकी चितळे हिने देखील उडी घेतली आहे.

 

हर हर महादेव चित्रपटाच्या शो दरम्यान मराहण झालेल्या तरुणाच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याने कलम 354 लावावे आणि प्लॅनिंग करुन सर्व केल्याने कलम 120 ब लावावे, अशी मागणी केतकीने केली आहे. वर्तक नगर पोलिसांनी कलमे वाढवली नाहीत तर केतकी हायकोर्टात (High Court) जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

काय म्हटले केतकी चितळेने?
जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल झाला.
मात्र त्यांच्यावर जी कलमं लावण्यात आली आहेत ती लगेच जामीन मिळतील अशी आहेत.
परंतु या कलमांमध्ये विनयभंगाचे कलम लावण्यात आलेलं नाही.
चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या कार्य़कर्त्यांनी गैरवर्तन केले.
त्यामुळे आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचं (Molestation) कलम लावावे. शिवाय हा हल्ला कट रचून केला आहे.
मात्र, पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचं कलम लावलं नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कलमात वाढ करण्यात यावी अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.

 

Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | actress ketaki chitale has demanded inclusion of more clauses against ncp leader jitendra Awhad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा मला अभिमान आहे – सुप्रिया सुळे

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील घटना