NCP MP Amol Kolhe | ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली : प्रत्येक चौकात २५ हजाराची वसुली करा, अमोल कोल्हेंना महिला वाहतूक पोलिसाने दाखवला मेसेज (Video)

मुंबई : प्रत्येक चौकात २५ हजार रुपयांची वसुली करा आणि २० वाहनांवर कारवाई करा, असे वसुलीचे टार्गेट वाहतूक पोलिसांना (Traffic Police) राज्य सरकारने (State Govt) दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी केला आहे. एका महिला वाहतूक पोलिसाने आपल्याला मोबाईलवरील हा मेसेज दाखवल्याचा दावा कोल्हे यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर एक पोस्ट करून हा प्रकार उघड केला.

अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर या वसुली प्रकरणाला वाचा फोडताना म्हटले आहे की, आजचा धक्कादायक अनुभव. मुंबईतून बाहेर पडताना एका सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी माझी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाइन दंड भरण्यास सांगितले.

मी स्वतः हा काय प्रकार आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाहतूक शाखेच्या त्या भगिनीने थेट मोबाइलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात २५ हजार रुपयांची वसुली व्हावी आणि २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असा उल्लेख त्या मेसेजमध्ये होता. (NCP MP Amol Kolhe)

अमोल कोल्हे यांनी या वसुलीचा हिशोब मांडताना पुढे म्हटले आहे की, मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत.
२५ ,००० x ६५२ = १, ६३, ००, ००० प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १. ६३ कोटी रुपये…इतर शहरांचं काय?

संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी
होतोय का याची जनतेला माहिती मिळेल. ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली, असा टोला कोल्हे यांनी राज्य सरकारला
शेवटी लगावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navardev BSc Agri | बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

Lingayat Vadhu Var | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुण्यात

Sangali News | होऊ दे खर्च! मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून हेलिकॉप्टरने गावाला तब्बल ३-४ तास प्रदक्षिणा

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

Monalisa Superhot Photo | मोनालिसाने सोफ्यावर बसून दिल्या हॉट पोज, व्हायरल फोटो पाहून नेटकरी गेले मोहून…