NCP MLA Rohit Pawar | ‘छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नेता फडणवीसांसोबत पहिल्या रांगेत’, रोहित पवारांचा संताप, म्हणाले- ‘महाराष्ट्राच्या जखमेवर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा भाजपने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपकडून (BJP) राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ (Savarkar Gaurav Yatra) काढली जात आहे. काल ही यात्रा नागपूरमध्ये पोहोचली. यात्रेच्या समारोपाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसलेल्या एका नेत्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान करणारा नेता फडणवीसांसोबत पहिल्या रांगेत बसतो, हे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी म्हटले आहे.

भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी (Rajya Sabha MP Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरुन राज्यभर त्यांचा निषेध करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या त्रिवेदी यांना भाजपने दिलेला सन्मान पाहून विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी यावरुन भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
पवार यांनी ट्विट करुन आपला संताप व्यक्त केरताना म्हटले, भाजपचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी याने
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केलं तेंव्हा भाजपाने त्याचा ना एका ब्र शब्दानेही निषेध केला,
ना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली.
पण याच भाजपाने आज नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून सुधांशु त्रिवेदीला
व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं आणि
‘महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो,’ हाच संदेश दिला.
शिवरायांना आराध्य दैवत मानणारा महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही!

Web Title :-NCP MLA Rohit Pawar | rohit pawar slams devendra fadnavis for seating with sudhanshu trivedi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, पण अजित पवारांनी कधीच विश्वासघात केला नाही’

Pune Crime News | माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, ३० लाखाच्या खंडणीची मागणी