NCP MLA Rohit Pawar | रोहित पवार ‘अधुनिक अनाजीपंत’ कोणाला म्हणाले? चर्चेला उधाण, सरकारवर केले गंभीर आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांची सध्या संघर्ष यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. सध्या ते विदर्भात आहेत. दरम्यान, रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. आश्चर्य म्हणजे रोहित पवारांच्या (NCP MLA Rohit Pawar) या पोस्टनंतर भाजपा (BJP) नेते आक्रमक झाले आहेत. भाजपाचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी पवारांवर पलटवार केला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवरून सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

रोहित पवार यांनी एक्स अकाउंट वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, युवा संघर्ष यात्रेत साडेचारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका ‘अनाजी पंत’ने संपवली. आताच्या काळामध्ये ‘महाराष्ट्र धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहे.

रोहित पवारांच्या (NCP MLA Rohit Pawar) या पोस्टनंतर भाजपचे नेते आक्रमक झाले असून भाजपचे
विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर पलटवार करत एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की,
रोहित पवार, तुमच्या माहिती करता…स्वराज्याची स्थापना आठरापगड जातींनी केली.
पण त्यावर घाव घालणारे सूर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्के होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी
गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबा शरद पवार हेच आहेत.

दरम्यान, रोहित पवार यांनी आज एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
या पोस्टमध्ये लिहिले आहे की, युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला
असल्याने तसेच युवा संघर्ष यात्रेला वाढता प्रतिसाद बघता काही अदृश्य शक्तींकडून खोट्या तक्रारींचा सपाटा लावून,
तसेच दबावतंत्राचा वापर करून माझे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा घाट घातला जात आहे.
अशा अदृश्य शक्तींना एक सांगू इच्छितो की, तुम्ही कितीही ताकद लावा आम्ही लोकांचा आवाज बुलंद करतच राहू.

दसऱ्याला पुण्यातून सुरू झालेली रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपूरमध्ये पोहचणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर थेट टिका, म्हणाले – ”नालायकांनो आपला पक्ष सांभाळा, आता त्याच पद्धतीनं उत्तर देऊ”

Amit Shah On CAA | CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अमित शाह यांच्या वक्तव्याने मोठ्या वादाची शक्यता