Maharashtra Political News | ‘देवेंद्र फडणवीस खोटारडा माणूस, लगेच बदलले’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंडखोरी (Rebellion) करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी पक्षात बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठींबा दिल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सत्ताबदलावरुन (Maharashtra Political News) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस हा खोटारडा माणूस आहे, अशी घाणाघाती टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या एका जुन्या विधानाची आठवण करुन दिली. फडणवीस यांनी काही महिन्यापूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीसोबत युती करणार नही, म्हणजे नाही… असे रोखठोक पणे सांगितले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीला सत्तेत सामील करुन घेतले आहे. (Maharashtra Political News)

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीवरुन एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधाला आहे.
ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खडसे म्हणाले, भाजपकडे (BJP) 105 आणि एकनाथ शिंदे गटाकडे
(Eknath Shinde Group) 40-42 किंवा 50 आमदार आहेत. म्हणजे सरकार बहुमतात आहे,
असे असताना इतरांना महायुतीमध्ये घेण्याचं काही आवश्यकता नव्हती. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की,
राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नाही… नाही… नाही एकवेळ ते लग्न न करणं पसंत करतील. अविवाहित राहणे पसंत करतील.
पण राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, असं फडणवीस बोलले होते. काय खोटारडा माणूस आहे, लगेच बदलले, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती! 50 पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती