NCP MP Supriya Sule | पुण्यात घरात घुसून बेछूट गोळीबार ! सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या – ‘घरात घुसून गोळीबार करण्याइतपत…’

पुणे : NCP MP Supriya Sule | ससून सारख्या मोठ्या हॉस्पिटलमधून ड्रग्ज रॅकेट (Sassoon Hospital Drugs Case) चालवल्याचे प्रकरण देशभरात गाजत आहे, शहरात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत अजून लोकांच्या मनात घर करून बसलेली आहे, त्यातच काल मध्यरात्री एका गुन्हेगाराने सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये शिरून एका परप्रांतीय तरूणाला गोळ्या (Pune Firing News) घालून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील घोरपडे पेठ येथे घडला आहे. या सर्व स्थितीची दखल घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, घरात घुसून गोळीबार करण्याइतपत गुन्हेगार निर्ढावले आहेत. पुण्यात एका व्यक्तीच्या घरात घुसून बेछूट गोळीबार करून त्याला ठार करण्यात आले. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीने थैमान घातले आहे.

सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे की, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. जे पार्ट टाईम गृहमंत्री महोदय आहेत, त्यांना आमदार फोडाफोडी आणि इतर राजकारण करण्यातून वेळ मिळत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे फावले असून ते राजरोसपणे गुन्हे करत आहेत.

एकीकडे शासन आपल्या दारी या कार्यक्रमापूर्वी विरोधी पक्षाच्या कार्यकत्र्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रचंड तत्परता
दाखविणारे गृहखाते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी
गृहमंत्री फडणवीस यांच्या कारभारावर आसूड ओढले आहेत.

पुण्यातील घोरपडे पेठेतील खडकमाळ आळीत सिंहगड गॅरेज चौक परिसरात एका सोसायटीत अनिल साहू (वय ३५)
हा परप्रातिय कामगार आपल्या पत्नीसोबत रहात होता. काल मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एक हल्लेखोर
साहूच्या घरात घुसला आणि गोळी झाडून त्याने अनिल साहूची हत्या केली.

साहू मुळचा बिहारचा असून हल्लेखोराचा तापास पोलीस करत आहेत. अनिल साहूला का मारण्यात आले ते कारण
अद्याप समजलेले नाही. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या साहूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | होम ग्राऊंडवर नामुष्की! अजित पवारांच्या पोस्टरला फासले काळे

Pune Drug Case | ललित पाटील पलायन प्रकरण : ससून रुग्णालयाचे डीन मेहरबान असल्याचा पुरावा आला समोर

Pune Police MCOCA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगार बाबुलाल मोहोळ व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 73 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA