NCP MP Supriya Sule | चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत?, संभाजी भिडेनंतर सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने नवा वाद (व्हिडिओ)

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी महिला पत्रकारांना साडी (Saree) का नेसत नाही? असा प्रश्न विचारला आहे. सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्या वक्तव्याचा भाजप महिला प्रदेशाध्यक्ष (BJP Women State President) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी समाचार घेतला आहे.

 

मराठी भाषा बोलताना तुम्ही, मग मराठी संस्कृती सारखे कपडे का नाही घालत, आपण वेस्टनायझेशन सर्व गोष्टींच करतोय, दिवाळी असली की ते तयार हून येतात, आत्मनिर्भर भारत (Aatmanirbhar Bharat), मग चॅनलवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही? चॅनलमधील मुली साडी का नाही नेसत, शर्ट आणि टाउझर का घालतात? असा सवाल सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी उपस्थित केला. त्या पिंपरी चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात बोलत होत्या.

 

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना चित्रा वाघ म्हणाल्या, टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

 

काय म्हणाले संभाजी भिडे?

संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेटी घेतली होती.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजी भिडे यांना एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने (Female Journalist) प्रश्न विचारला.
तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली? यावर ‘तू आधी कुंकू किंवा टिकली लाव,
तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे.
भारत माता विधवा नाही आहे’, असे विधान भिडे यांनी केले.

 

 

Web Title :- NCP MP Supriya Sule | why you wont wear saree in studio supriya sule asks women journalists

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा