Pune Navale Bridge Accident | नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरूच, भरधाव ट्रँकरची 15-16 गाड्यांना धडक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | पुणे-बंगळुरु महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरु आहे. नवले ब्रिज अपघाताचा (Pune Navale Bridge Accident) हॉटस्पॉट (Hotspot) ठरला असून रविवारी (दि.20) रात्री भीषण अपघात झाला आहे. एका मोठ्या टँकरने 15 ते 16 गाड्यांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे नवले ब्रीजवर वाहतूक कोंडी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

 

नवले ब्रीजवर रविवारी रात्री एका मोठ्या टँकरने 15 ते 16 गाड्यांना जोरात धडक दिली. या अपघातात चारचाकी गाड्यांसह दुचाकींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

जीवघेणा उतार, सुरक्षिततेच्या सुविधांचा अभाव आणि वेगावरील नियंत्रणाकडे वाहन चालकांचे दुर्लक्ष अशा कारणांमुळे
पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पूल ते नऱ्हे दरम्यानचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
आजपर्य़ंत याठिकाणी अनेक अपघात झाले असूने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

Web Title :- Pune Navale Bridge Accident | A series of accidents continues in the
Navle Bridge area, a speeding truck collides with 15-16 cars

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Haddi Movie | ‘हड्डी’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर करणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

Devendra Fadnavis | शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-‘राज्यपालांच्या बोलण्याचा… ‘ (व्हिडिओ)

Pune Crime | सोशल मीडीयाचा वापर केला मेफेड्रोन व चरस विक्रीसाठी, दोन तरुणांना गुन्हे शाखेकडून अटक