NCP Political Crisis | काल अजित पवारांच्या शपथविधीला तर आज शरद पवारांच्या स्वागताला हजर, ‘या’ आमदाराचा नेमका पाठिंबा कोणाला?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Political Crisis | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेले. या आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा भूकंप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची (DyCM Oath) तर इतर आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना पक्षातील किती आमदारांचा पाठिंबा (NCP Political Crisis) आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, काल अजित पवार यांच्या शपथविधीला हजर असलेले आमदार आज शरद पवारांच्या स्वागताला पुढे आल्याचे दिसून आले.

साताऱ्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) हे काल अजित पवार यांच्या शपथविधीला हजर होते. तर आज शरद पवारांच्या साताऱ्या दौऱ्यावेळी त्यांच्या स्वागताला आल्याचे दिसून आले. त्यामुळे मकरंद पाटील नेमके कोणाच्या बाजूने आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शपथविधीला गेलेले अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यातच आज आमदार मकरंद पाटील यांनी साताऱ्यात शरद पवारांचे स्वागत केले. एवढेच नाहीतर शरद पवार यांच्या गाडीत बसून ते पुढे रवाना झाले. त्यामुळे काल अजित पवारांसोबत अन् आज शरद पवारांसोबत असलेले मकरंद पाटील नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.

पक्षातील बंडानंतर शरद पवारांचा कराड दौरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट (NCP Political Crisis) पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा नव्याने संघटना बांधणी करण्यास सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यात आज शरद पवार कराड येथील माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण (Former CM Late Yashwantrao Chavan) यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होणार आहेत. त्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या कार्यकर्त्यांना शरद पवार संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title :   NCP Political Crisis | ncp mla makarand patil who attended the swearing in ceremony of ajit pawar welcomed sharad pawar at satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा