NCP Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | बाळासाहेब शिवाजी पार्कवरुन शरद पवारांवर टीका करायचे पण…, सुप्रिया सुळेंचा दसरा मेळाव्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

पुणे : NCP Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | आम्ही जेव्हा शिवसेनेच्या विरोधात होतो, तेव्हा शिवसेनेच्या बाबतीत असे कधीही केले नाही. शिवसेनेचा भव्य मेळावा व्हायचा. आम्हीही तो उत्सुकतेने पहायचो. आमच्यावर काय टीका करतात याची आम्हाला उत्सुकता असायची. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) शिवाजी पार्कवरुन (Shivaji Park, Mumbai) शरद पवारांवर (NCP Chief Sharad Pawar) टीका करायचे यातच तर गम्मत आहे. विरोधक हा दिलदार असावा. नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मज्जा कशी येणार, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. (NCP Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt)

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पुणे मनपा आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. शिंदे-फडणवीस सरकारवर (Eknath Shinde – Devendra Fadnavis Government) टीका करताना खासदार सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री असताना पुण्यात दर आठवड्याला आढावा बैठक व्हायची. पण, आता सत्ताधारी तसे काहीच करत नाहीत. त्यामुळे विकासकामे प्रलंबित आहेत. तसेच 23 गावातील कचरा आणि पाणी समस्या अजूनही तशीच आहे.

खासदार सुळे म्हणाल्या, प्रशासक आणि शहाराला पालकमंत्री नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
म्हणूनच खासदार या नात्याने पुणे मनपा आयुक्तांची भेट घेऊन या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.
त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना सरकारवर आणि शिंदे गटावर टिकाही केली.

खासदार सुप्रिया सुळे मागील काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकरर्तेपणावर सतत टीका करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच सुळे यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले होते की, माय-बाप जनतेला वार्‍यावर सोडणे
कितपत योग्य याचे आत्मचिंतन ओरबाडून आलेल्या खोके सरकारने करावे.

Web Title :- NCP Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | it is strange that sharad pawar was criticized from balasaheb shivaji park ncp mp supriya sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Amravati ACB Trap | 1500 रुपये लाचेची मागणी करुन 500 रुपये लाच घेताना गुन्हे शाखेतील दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात