विद्यासागर राव हे राज्यपाल की RSS चे प्रचारक ? ; राष्ट्रवादीचा सवाल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आरएसएसचीचे कौतुक केले होते. त्यावरून सोशल मीडियावरून विद्यासागर राव यांच्यवर टीका होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून विद्यासागर राव यांच्यावर टीका केली आहे.

राज्यपाल की संघाचे प्रचारक…?, असा सवाल राष्ट्रावादीने उपस्थित केला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा आरएसएस देशातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक आहे, असे धक्कादायक विधान महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी नागपुरात केलेय. या विधानानंतर सोशल मीडियात त्यांच्यावर टीकेची झोडच उठली आहे, असं ट्वीट केले आहे.

तसंच राज्यपाल हे पद संविधानिक आहे, त्यांनी निष्पक्ष असणे अपेक्षित असते. पण मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये केलेल्या या विधानामुळे ते राज्यपाल आहेत की संघाचे प्रचारक, असा प्रश्न त्यांना नेटिझन्सनी केलाय, असं ट्वीट राष्ट्रवादीने केलं आहे.

दरम्यान, आरएसएस सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक आहे. कारण या संघटनेने प्रत्येक व्यक्तीचे मत आणि धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांचा नेहमी सन्मान केला, असं विद्यासागर राव यांनी म्हटलं होतं.