राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर चाकण येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा चाकण पोलिसात दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे. एकेकाळी त्यांचा कट्टर असलेला आता मात्र वैरी झाला आहे. त्यांच्यात आणि स्वीकृत नगरसेवकात सध्या वाद सुरू आहेत. याविषयी सध्या चाकण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. तर तक्रारदार २७ वर्षीय महिलेच्या पतीवर देखील अपहरणाचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे काहीकाळ चाकण परिसरात तणावाचे वातावरण होते.

[amazon_link asins=’8172234988′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’843fbcc2-80dc-11e8-9be6-3775a3f1d04d’]

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार २७ वर्षीय महिलेच्या पतीचे म्हणजेच स्वीकृत नगरसेवकाचे मार्केटयार्ड येथे एक दुकान आहे. दुकानात माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील हे बुधवारी आठच्या सुमारास गेले होते. मात्र त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक नव्हता, त्यांनी तिथं उपस्थित असलेल्या पत्नीला तुझा नगरसेवक पती कुठे आहे. त्याने अनेक हत्या केल्या आहेत, त्याला व्यवस्थित राहायला सांग अशी दमबाजी आणि शिवीगाळ केली आणि नगरसेवक पत्नीच्या हाताला धरून खेचले. असे आरोप करत मोहित-पाटील यांच्यावर चाकण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री पावणे दोन वाजता तक्रारदार महिलेचा पती म्हणजेच स्वीकृत नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होण्यापूर्वी दोन्ही कडील मोठे टोळके जमा झाले होते. त्यामुळे काहीकाळ शहरात तणावाचे वातावरण होते.१५ दिवसांपूर्वी तक्रारदार महिलेच्या पती विरोधात विणयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु ही तक्रारदार महिला माजी आमदार मोहिते पाटील यांच्या गटाची असल्याची चर्चा आहे. या घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.