बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नीता फरांदे

बारामती, पोलीसनामा ऑनलाइन – बारामती पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्विवाद सत्ता असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती पंचायत समितीच्या सभापती पदावर नीता फरांदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षश्रेष्ठी यांच्या सूचनेनुसार एक महिन्यापूर्वी मावळत्या सभापती नीता बारवकर यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसभापती प्रदिप धापटे यांना एक महिन्याच्या कालावधीसाठी प्रभारी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

आज झालेल्या सभापती पदाच्या निवडीसाठी मुरूम येथील नीता फरांदे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी नीता फरांदे यांची बारामती पंचायत समितीच्या सभापती बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

यावेळी उपसभापती प्रदिप धापटे, नीता बारवकर, संजय भोसले, शारदा खराडे,लीलाबाई गावडे, भारत गावडे, रोहित कोकरे, राहुल भापकर, मेनका मगर,अबोली भोसले, राहुल झारगड, तहसीलदार विजय पाटील,गट विकास अधिकारी राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, माऊली कदम, गौतम काकडे, नवनाथ मगर,शाब्बीर शेख आदी उपस्थित होते.