पोलिस बंदोबस्तात निळवंडे कालव्याचे काम ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – निळवंडे कालव्याच्या कामासाठी भू-संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उद्यापासून पोलीस बंदोबस्ताशिवाय कालव्याचे काम सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे आयोजित बैठकीत जाहीर केले.

निळवंडे येथील कालव्याच्या कामावरून वाद निर्माण झाला होता. कालव्यांचे कामही प्रकल्पग्रस्त व कालवेग्रस्तांनी बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, आ. वैभव पिचड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी देता येणार नाही. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात तच कालव्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे. उद्यापासून पोलिस बंदोबस्तात कालव्याचे काम सुरू केले जाईल.

अकोले येथील स्थानिक नागरिकांनी निळवंडे कालव्याचे काम बंद पाडले होते. त्यावरून नवा राजकीय वाद सुरू झाला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्यावर जोरदार टीका केली होती. कालव्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, असा इशारा त्यांनी दिला होता.

You might also like