शहरातील गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज : डाॅ. के. व्यकंटेशम्

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-

शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचे मत शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्‍त डाॅ. के. व्यकंटेशम् यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवार (दि.3 आॅगस्ट) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मावळत्या पोलीस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला यांच्याकडून पुणे पोलीस आयुक्‍ताची सुत्रे स्विकारल्यानंतर आज (सोमवार) त्यांनी शहरातील पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी शहरातील अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये कोण-कोणत्या समस्या आहेत या गोष्टीचा आढावा देखील त्यांनी घेतला.
[amazon_link asins=’B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1affc205-9981-11e8-a188-0f9774af0b30′]

गुन्हेगारांना पोलिसांची भिती वाटलीच पाहिजेः
शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या बाबातीत विचारले असता, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असायला हवा, मात्र हे सर्व करत असताना आम्ही शहरातील नागरिकांच्या सोबत आहोत. त्यांच्यामध्ये सुरक्षितेची भावना निर्माण करणे हे पोलिसांचे प्रथम काम आहे. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हाच ते पोलिसांना सहकार्य करतील असेही त्यांनी म्हटले आहे.

नागपूर पॅटर्न नाहीतर पुणे पॅटर्न नुसार काम करणारः
पोलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम् यांनी यापुर्वी नागपूर शहराचे आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यांना तेथील ठिकाणच्या कामाचा चांगला अनुभव आहे. नागपूर शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग राबविले आहेत. कामाच्या माध्यमातून त्यांनी नागपूरमध्ये आपली वेगळीच अोळख निर्माण केली. मात्र पुणे आणि नागपूर शहरात विविधता असल्यामुळे पुणे शहरात काम करत असताना पुणे पॅटर्ननुसारच काम केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

नारिकांच्या समस्या व तक्रारीसाठी व्हाॅट्सअॅप नंबरः
पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यास अनेकदा नागरिकांच्या समस्या एेकूण घेतल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सुचना, तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहचविता याव्यात यासाठी पोलिसांच्या वतीने 8975283100 हा नंबर देण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिकांना आपल्या तक्रारी तसेच सुचना पाठविता येणार आहेत. या ग्रुपवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असणार असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
[amazon_link asins=’B01MU4PM6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20e1a60e-9981-11e8-bd7e-bffaca8891e6′]

शहरातील वाढते अपघात, वाहन चोरी आणि वाहतूक कोंडीवर विचारले असता त्यांनी वाढते अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. हेल्मेटचा वापर केल्यामुळे किमान आपला जीव वाचण्यासाठी तरी त्याचा उपयोग होतो असे त्यांनी म्हटले. शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटना पाहता, गाडी घेताना आपण लाखो रुपयांची गाडी विकत घेतो मात्र त्याला एखादे चांगले लाॅक घेत नाही. तसेच वाढती वाहतूक कोंडी तोडण्यासाठी ठोस उपायोजना करण्याची गरज असून, तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यावर लवकरात लवकर ठोस उपायोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.