नीना गुप्ताची मुलगी ‘मसाबा’नं पतीपासून घेतला ‘घटस्फोट’, काही वर्षच टिकलं लग्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार नीना गुप्ताची लेक आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिनं पतीपासून घटस्फोट घेतला आहे. तिचा पती मधु मंटेना प्रसिद्ध फिल्म निर्माता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यामध्ये खटके उडत होते.

दोघांमध्ये काहीच आलबेल नसल्यानं खूप दिवसांपासून मसाबा तणावात होती. यानंतर दोघांनी सहमती दाखवत 2019 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. यानंतर कोर्टानं डिवोर्सवर शिक्कामोर्तब केलं होतं. 2018 मध्ये मसाबानं सोशल मीडियावर वेगळं होण्याबद्दल भाष्य केलं होतं. मसाबानं लिहिलं होतं की, हा तिच्यासाठी वाईट काळ आहे. ते आपल्या नात्याला मजबूत नाही देऊ शकले. आम्ही आमच्या कुटुंबाशी आणि दोस्तांसोबत बोलणी केली आहे. या वाईट काळात तिला एकटं रहायचं होतं आणि तिला प्रायव्हसी हवी होती.

नीना गुप्तासाठी तिच्या मुलीचा हा निर्णय एका झटक्यासारखाच होता. एका मुलाखतीत नीनानं सांगितलं होतं की, कोणताही निर्णय घाईत घेऊ नको. एकदा विचार कर. मधु आपल्याला आवडतो. तो चांगला माणूस आहे. परंतु काही झालं नाही. मसाबा ही नीना गुप्ता आणि माजी वेस्ट इंडिज क्रिकेटर विवयन रिचर्ड्स यांची मुलगी आहे.

मधुनं गजनी, रण, मौसम यासांरखे अनेक सिनेमे प्रोड्युस केले आहेत.