बायडन यांच्या टीममध्ये आणखी एक भारतीय-अमेरिकन, जाणून घ्या कोणत्या 3 शक्तीशाली पदांवर भारतीय वंशाच्या लोकांची नियुक्ती

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था  –    अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी अर्थमंत्री पदासाठी जेनेट येलेन आणि व्हाइट हाऊसचे प्रमुख पद ‘व्यवस्थापन आणि बजेट कार्यालय’ संचालक म्हणून भारतीय-अमेरिकन नीरा टंडन यांना नियुक्त केले. जर अमेरिकेन सीनेटकडून यास संमती मिळाली तर 74 वर्षीय येलन 231 वर्षांच्या इतिहासात अर्थ मंत्रालयाचे नेतृत्व करणार्‍या पहिल्या महिला असतील.

जर अमेरिकन सीनेटमध्ये या पदासाठी टंडन (50) यांच्या नावाची संमती झाली तर त्या व्हाइट हाऊसमध्ये प्रभावशाली ‘व्यवस्थापन आणि बजेट कार्यालय’ (ओएमबी) च्या प्रमुख बनणार्‍या पहिल्या कृष्णवर्णीय महिला असतील. टंडन सध्या डाव्या विचारांच्या ‘सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

कमला हॅरिस दुसर्‍या सर्वात शक्तीशाली पदावर

अमेरिकन निवडणुकीत जो बायडन यांच्या विजयासह भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचे सुद्धा उपराष्ट्राध्यक्ष पदावर बसणे जवळपास निश्चित झाले. कमला हॅरिस भारतीय आणि अफ्रिकी वंशाच्या आहेत. कमला यांच्या आईचे नाव श्यामला गोपालन हॅरिस आहे. त्या भारतीय आहेत. तर त्यांचे वडिल जमैकाचे आहेत आणि त्यांचे नाव डोनाल्ड हॅरिस आहे.

यापूर्वी भारतीय-अमेरिकन माला अडिगा यांना मिळाले आहे हे पद

अमेरिकचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय-अमेरिकन माला अडिगा यांना आपली पत्नी जिल बायडन यांच्या धोरण संचालक नियुक्त केले आहे. देशाच्या पुढील प्रथम महिला बनण्यासाठी निघालेल्या जिल यांचे प्रामुख्याने लक्ष शिक्षणावर केंद्रीत आहे, यासाठी शिक्षण धोरणसंबंधी अनुभवी माला अडिगा यांना या पदासाठी निवडले आहे.

अडिगा बायडन यांच्या 2020 प्रचार मोहिमेच्या वरिष्ठ धोरण सल्लागार आणि जिल यांच्या वरिष्ठ सल्लागार होत्या. त्यांनी अगोदर उच्च शिक्षण आणि सैन्य कुटुंबाच्या संचालक म्हणून बायडन फाऊंडेशनसाठी सुद्धा काम केले आहे.

त्या यापूर्वी तत्कालीन ओबामा प्रशासनात ‘ब्यूरो ऑफ एज्युकेशनल अँड कल्चरल अफेयर्स’ मध्ये अकॅडमिक कार्यक्रमांसाठी परराष्ट्र मंत्रालयात उप सहायक सचिव हात्या आणि त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘ऑफिस ऑफ ग्लोबल विमेन्स इश्यूज’ मध्ये चीफ ऑफ स्टाफ आणि विशेष दूताच्या वरिष्ठ सल्लागार म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडली आहे.