नील नितीन मुकेशच्या घरात कोरोनाचा शिरकाव, 2 वर्षाच्या मुलीसह संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव प्रत्येक क्षेत्रात झाल्याचे पहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये कोरोनाने सर्वांनाच धडकी भरवली हे. मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता अभिनेता नील नितीन मुकेश याच्यासह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. नील, नीलचे वडील, भाऊ, पत्नी आणि दोन वर्षाच्या चिमुकलीला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

 

 

 

 

नील नितीन मुकेशने त्याच्या इंस्टाग्रामवर 17 एप्रिलला एक पोस्ट शेअर करत सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करताना त्याच्या कुटुंबातील सर्वांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. माझ्या कुटुंबात फक्त आईच ठिक आहे. उर्वरित आम्ही सगळे जण कोरोना पॉझिटिव्ह आहोत. माझी दोन वर्षाची मुलगी नुर्वी ही देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे. अशात माझी स्थिती तुम्ही समजू शकता दोन दिवसांपूर्वी नूर्वीला ताप आला होता. त्यामुळे आम्ही तिची व सर्वांची कोरोना टेस्ट केली. मी, रुक्मिणी, पापा, भाऊ नमन, नूर्वी सगळेच पॉझिटिव्ह आलोत. आई मात्र ठीक आहे, असे नीलने एका वेबसाईटला सांगितले.

 

 

 

 

प्रत्येक व्यक्तीला व्हायरसची लागण वेगवेळ्या पद्धतीने होत आहे. आतापर्यंत आमच्यापैकी कोणालाच गंभीर स्वरुपाची लक्षण आढळून आली नव्हती. पण काळजी वाटते. बाबांचे वय 70 वर्षे आहे. नूर्वी केवळ दोन वर्षांची आहे. त्यांची काळजी वाटतेय. त्यामुळे सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करा, असे नील म्हणाला. कृपया करुन गाईडलाईन्सचे पालन करा, शक्य असेल तर घरी रहा, असे आवाहन नीलने केले आहे.