Nems School Pune | एनईएमएस शाळेत चिमुकल्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nems School Pune | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या Deccan Education Society (DES Pune) एन्.ई.एम्.एस्. (Nems School Pune) शाळा (Shaniwar Peth, Pune) येथील पूर्व प्राथमिक विभागातील (NEMS Pre Primary Section) विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. मुलांमध्ये असलेली कला ,त्यांच्यातील कौशल्य ,पाठांतर ,खेळातील चपळता,या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन वर्षभरात करण्यात आले होते.
श्लोक पाठांतर ,गोष्ट सांगणे , चित्रकला ,अभिनय गीत गायन स्पर्धा ,चमचा लिंबू ,अडथळ्यांचे शर्यत या विविध स्पर्धांमध्ये मुले सहभागी झाली होती. यावेळी शाळेच्या प्राथमिक विभागातील मुख्याध्यापिका अर्चना धनावडे (Archana Dhanawade) यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे मेडल व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. मनीषा सूर्यवंशी (Manisha Suryavanshi Pune) व करिष्मा शहा (Karisma Shah Pune) यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी (HM Shilpa Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. (Nems School Pune)
Web Title : Nems School Pune | Prize distribution ceremony of toddlers in NEMS school in excitement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sindhu Seva Dal | सिंधू सेवा दलातर्फे गुरुवारी ‘चेटीचंड’ महोत्सव
Blood Donation Camp In Pune | शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे 20 मार्च रोजी रक्तदान शिबीर