Neo Metro on HCMTR Route | एचसीएमटीआर मार्गावरील निओ मेट्रोचा प्रस्ताव आणखी काहीकाळ थंडबस्त्यात!

देशात अद्याप या प्रकल्पाला कोठेच मान्यता नसल्याने विलंब होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Neo Metro on HCMTR Route | शहराच्या भोवती प्रस्तावित असलेल्या एचसीएमटीआर या मार्गावरील निओ मेट्रोचा प्रस्ताव लांबण्याची शक्यता आहे. नाशिक येथे निओ मेट्रो (Nashik Neo Metro) उभारण्याचा प्रस्ताव असुन, अद्याप त्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली नाही. नाशिकला मंजुरी मिळाल्यानंतरच पुण्यातील निओ मेट्रोचा मार्ग मोकळा होऊ शकतो. (Neo Metro on HCMTR Route)

सामान्य मेट्रो मार्ग उभारण्यासाठी प्रति किलोमीटर अडीचशे कोटी रुपये इतका खर्च येतो. तुलनेत निओ मेट्रोसाठी प्रति किलोमीटरला शंभर कोटी रुपये इतका खर्च येतो. यामुळे कमी खर्चात जास्त प्रवासी वाहतुक करणारी व्यवस्था निओ मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. याबाबत गेल्या दोन वर्षापासून चर्चा सुरु आहे. पीएमआरडीएकडून (PMRDA) या निओ मेट्रो चा आराखडा तयार केला गेला आहे. मुंबई येथे झालेल्या ‘वॉर रुम’ बैठकीत या विषयावर चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. याविषयी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी माहीती दिली. (Neo Metro on HCMTR Route)

पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर या दोन शहरातुन हा एचसीएमटीआर उन्नत मार्ग जात आहे. या मार्गावर निओ मेट्रो सुरु करण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. परंतु पीएमआरडीएने या उन्नत मार्गाचा आराखडा दिला असुन, त्यामध्ये काही त्रुटी असुन, त्याविषयी महापालिकेने आक्षेप घेतले, काही सुचना केल्या आहेत. तसेच निओ मेट्रो अद्याप देशात कोठेही सुरु झाली नाही. नाशिक शहरात निओ मेट्रो सुरु करावी असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला गेला आहे. परंतु अद्याप केंद्र सरकारकडून नाशिकच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही, ती मिळाल्यानंतरच पुण्यातील निओ मेट्रोचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

मेट्रोची देणी टप्प्या टप्प्यात देणार

पुणे महामेट्रोला पुणे महापालिका सुमारे दिडशे कोटी रुपये देणे बाकी आहे. गेल्या महीन्यात मेट्रोला चाळीस कोटी रुपये दिले गेले होते. उर्वरीत रक्कम ही टप्प्या टप्प्याने दिली जाणार आहे. तसेच महापालिकेने केलेल्या कामाची रक्कम या थकीत रक्कमेतून वगळली जाणार आहे.

मेट्रो स्थानकाजवळ पार्कींगला जागा देणार

शहरात पुणे महामेट्रो आणि पीएमआरडीए असे दोन मेट्रो मार्ग उभे केले जात आहे. या मेट्रो मार्गावरील स्थानकाच्या भागात पार्कींगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या दोन्ही कंपन्यांनी केली आहे. त्यांना महापालिकेच्या ताब्यात आलेल्या सार्वजनिक वापराच्या जागा दिल्या जाणार आहेत.

पीएमआरडीएच्यावतीने गणेश खिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाच्या रॅम्पचे काम बाणेर रस्त्यावरून
सुरू करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील काही संस्था आणि खाजगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया
देखिल लवकरच सुरू केली जाणार आहे.
यासंदर्भात संबधित संस्था आणि जागा मालकांसोबत चर्चाही झाली आहे.
या संस्थांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या जागा ताब्यात घ्याव्या लागणार असल्याने भूसंपादनानंतर
त्यांच्या सिमाभिंतींचे काम पीएमआरडीए आणि महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
तसेच येथील सेवा वाहीन्यांचेही स्थलांतर करावे लागणार आहे.
या सर्व कामासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार असून पीएमआरडीए ५० टक्के खर्च देईल,
असा निर्णयही मंत्रालयातील वॉर रुममधील बैठकीत झाल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

Devendra Fadnavis | सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादीच, ही खेळी शरद पवारांची; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती