भारताच्या ‘या’ वस्तू खरेदी करण्यास नेपाळचा नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि नेपाळ हे दोन शेजारी देश एकमेकांशी मोठ्या प्रमाणात व्यापार करत असतात. मात्र आता नेपाळने याबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे, नेपाळने भारताच्या भाजीपाला आणि फळांच्या खरेदीवर बंदी घातली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार नेपाळ सरकार आता भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या भाजीपाला आणि फळांचे काठमांडूमधील लॅबमध्ये परीक्षण केले जाणार आहे. याविषयी नेपाळ सरकरने नुकताच अध्यादेश काढला आहे. त्यानंतरच हा माल नेपाळमधील मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या भाजीपाला आणि फळांना एनओसी मिळाल्यानंतर हा भाजीपाला बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. याआधीदेखील लॅबमध्ये चाचणीत फेल झाल्यानंतर हजारो भारतीय ट्रक नेपाळच्या कस्टम विभागाने भारतात पुन्हा पाठवले होते.

पुढे काय होणार
नेपाळ सरकारच्या या निर्णयानंतर व्यापारी हा परत पाठवलेला भाजीपाला आणि फळे तिथेच सीमेवर मिळेल त्या भावात विकण्यासाठी मजबूर झाले आहेत. तर काही ट्रक अजून नेपाळ सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर भारताच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी या बाबतीत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

काय आहे प्रकरण
नेपाळ सरकारने नवीन कायद्यानुसार भारतातून आयात केली जाणारी प्रत्येक भाजी आणि फळे तेथील लॅबमध्ये तपासली जाणार असून जर या चाचणीत ते पास झाली तरच नेपाळमधील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मात्र माध्यमांत आलेल्या माहितीनुसार भारतात मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये कीटकनाशकांचा प्रयोग केला जात असल्याने नेपाळमधील नागरिकांच्या आरोग्यावर हा भाजीपाला खाल्ल्याने प्रभाव पडत असल्याने सरकरने हा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे.

दरम्यान, १७ जूनपासून नेपाळ सरकारने याबाबतीत निर्णय घेतला असून यापुढे प्रत्येक ट्रकमधील वस्तू या लॅबमध्ये चाचणी करूनच नेपाळमध्ये विक्रीसाठी घेतली जाणार आहे. याविषयी भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळ सरकारशी याविषयी चर्चा सुरु असून लवकरच यावर तोडगा निघण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक बातम्या 

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण

या मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म