‘नेटफ्लिक्स’ आणणार ‘हे’ 3 ‘स्वस्त’ प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – स्ट्रिमिंग सर्विस नेटफ्लिक्स कंपनीने भारतात आता आपला जम बसवला आहे, नेटफ्लिक्सची मागणी देशात वाढली आहे. काहीच दिवसांपूर्वी कंपनीने मोबाइल प्लॅन लॉन्च केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनी आपले नवे स्वस्त प्लॅन देशात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आता नेटफ्लिक्सकडून लॉन्ग टर्म प्लॅनची टेस्टिंग सुरु आहे. नेटफ्लिक्सचे नवीन तीन प्लॅन असून त्यात तीन महिने, सहा महिने आणि 12 महिने असे प्लॅन असतील.

भारतात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने नेटफ्लिक्स भारतात नवे लॉन्ग टर्म प्लॅन आणण्याचा तयारीत आहे. काही निवडक ग्राहकांना नेटफ्लिक्सच्या अ‍ॅपवर हे प्लॅनचे पर्याय उपलब्ध करुन दिले जात आहे. परंतू हे प्लॅन कधी लॉन्च होणार आहेत यावर कंपनीकडून माहिती देण्यात आली नाही.

कंपनीचे प्रवक्ते यावर बोलताना म्हणाले की नेहमीप्रमाणे ही एक टेस्टिंग सुरु आहे. लोकांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरल्यानंतर हे प्लान आणले जाईल. सदस्यांसाठी काही महिन्यांची सब्सक्रिप्शन एकदा देणे फ्लेग्झिबल असू शकते असे कंपनीला नेहमी वाटते असेही प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.

या लॉन्ग टर्म प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांचे या प्लॅनमागे 20 ते 50 टक्के पैशांची बचत होऊ शकते. 199 रुपयांचा नेटफ्लिक्सचा प्लॅन फक्त भारतात देण्यात येतो. तर लॉन्ग टर्ममध्ये सुरुवातीचा प्लॅन हा 1 हजार 921 रुपयांपासून सुरु होऊ शकतो. तीन महिन्याचा प्लॅन 1 हजार 991 रुपयांचा, सहा महिन्याचा प्लॅन 3 हजार 359 रुपये तर 12 महिन्याचा प्लॅन 4 हजार 799 रुपयांचा असेल. या प्लॅनची तुलना सध्याच्या प्लॅनबरोबर केली तर हे नवे प्लॅन 50 टक्के स्वस्त असतील.

तनमय पटेल नावच्या एका ट्विटर यूजरने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे त्यात त्याने म्हणले की, अ‍ॅण्ड्रायड स्मार्टफोनच्या नेटफ्लिक्स अ‍ॅपवर या प्लॅनची माहिती मिळाली. परंतू कंपनीकडून हे प्लॅन अधिकृत केले नाहीत. नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आले की चाचणी म्हणजे प्लॅन लॉन्च होतीलच असे नाही. ग्राहकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर कंपनी हे प्लॅनचे लॉन्चिंग रद्द करु शकते.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like