फायद्याची गोष्ट ! ‘कोरोना’च्या संकटात नोकरी नाही तर ‘नो टेन्शन’, आता घरातच चालु करा ‘हा’ व्यवसाय, कमाई होईल लाखोंनी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात उच्छाद मांडला आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमविल्या आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे बाहेर पडता येत नाही. मात्र, असे काही व्यवसाय आहेत, हे घरी बसल्या सुरू करता येतील. याद्वारे तुम्हाला काही नवीन करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणीदेखील दूर होतील.

या व्यवसायात टेरेस फार्मिंग हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यातून आपल्याला उत्तम आणि रोख पैसे मिळतात. यात मातीचा वापर फारसा केला जात नाही आणि वनस्पतींसाठी आवश्यक पोषकद्रव्य पाण्याच्या मदतीनं थेट वनस्पतीच्या मुळांमध्ये पोहोचवलं जातं. याला हायड्रोपोनिक्स म्हणतात. टेरेस फार्मिंगची ही कल्पना सोपी आणि कुठेही न जाता करता येते.

आयआयटी पदवीधर असलेले कौस्तुभ खरे आणि साहिल पारीख यांनी या व्यवसायातून चांगली प्रगती केली असून दोघांनी ‘खेतीफाई’ कंपनी सुरू केली. त्यांनी केवळ 19 हजार रुपयांत 200 वर्ग मीटरच्या छताला शेत बनवत 700 किलोपर्यंत भाज्या उगवल्या आहेत. या दोघांनीही एक मॉडेल तयार केलं, ज्यात माती वापरली जात नाही. सोबतच अत्यंत कमी पाण्याचा वापर केला जातो. यात लागवडीसाठी बेड बनवले जातात, जे वॉटर-प्रूफ असतात. सेंद्रिय पदार्थांनी बनलेल्या बेडमध्ये भेंडी, टोमॅटो, वांगे, मेथी, पालक, हिरव्या भाज्या आणि मिरच्या यांची चांगली वाढ होते. पाणी गोड असल्याने भाज्याही चवदार बनतात. यात प्रामुख्याने नारळाचे कवच (कोरडी साल) घातली जाते. मातीचा कमी वापर असल्याने छतावर जास्त वजन पडत नाही आणि पाणी गळतीची चिंता नसते.

दरम्यान, मोठमोठ्या इमारतींमुळे शेती करण्यासाठी जमिन राहिली नाही. ज्यामुळे अर्थातच लागवड कमी होत आहे, असेच सुरु राहिल्यास भविष्यात या भाज्यांची वाढेल, एक कुटुंब 4 फूट बाय 4 फूट चार बेड लावून भाजीपाला महिनाभर पिकवू शकतो. या व्यवसायातून कमी खर्च आणि जास्त नफा मिळतो.