14 वर्षानंतर ‘बजाज चेतक’चं पुनरागमन, भारतात 1 लाख रूपयांमध्ये झाली लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बजाज ऑटो ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर Bajaj Chetak भारतात लाँच केली आहे. कंपनीने मागील वर्षीच ही स्कूटर सादर केली होती. परंतु मंगळवारी याच्या किमतीवरून पडदा काढण्यात आला. Bajaj Chetak EV ची प्रारंभिक किंमत १ लाख रुपये असणार आहे. या नवीन इलेक्ट्रिक चेतकला बजाजच्याच इन-हाऊस मधून डिझाइन आणि डेव्हलप करण्यात आले आहे. या नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री अनेक टप्प्यांमध्ये होणार आहे. सुरुवातीच्या काळात या स्कूटरची विक्री बंगळुर आणि पुण्यात होणार आहे. यासाठी बजाज बंगळूरमधील १३-प्रो-बाइकिंग डीलरशिप आणि पुण्यातील चार स्टोअरमध्ये विक्री करेल.

बजाज ऑटो आपली इलेक्ट्रिक चेतकची बुकिंग १५ तारखेपासून सुरू करत आहे. भारतीय बाजारात या स्कूटरचे एकूण ६ प्रकार विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय अर्बन आणि प्रीमियम हे दोन मॉडेल लाइनमध्ये येतील. सिंगल चार्जवर ही इलेक्ट्रिक स्कूटर ९५ किलोमीटर धावणार आहे. कंपनीकडून यावर ३ वर्षाची किंवा ५०,००० किमीची (जे आधी येणार ते) हमी दिली जाईल.

राइडिंग मोड्स –
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला दोन राइडिंग मोड्स मिळतात. यामध्ये सिटी आणि स्पोर्ट सारख्या दोन राइडिंग मोड्सचा समावेश आहे.

इन्स्ट्रुमेंट क्लस्टर –
बजाज चेतकच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये संपूर्णपणे डिजिटल कन्सोल देण्यात आले आहे. आपण यास आपल्या स्मार्टफोनशी देखील कनेक्ट करू शकतात, जिथे आपल्याला रिअल टाइम माहिती आपल्या स्मार्टफोनवर मिळेल.

स्टाईल –
चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीने रेट्रो लूक दिला आहे. याचा राउंड DRL स्कूटरला अतिशय स्टायलिश लुक देत असतो.

Keyless Start –
या स्कूटरमध्ये आपल्याला की-लेस फीचर मिळणार आहेत. म्हणजेच, तुम्ही या स्कूटरला चावीशिवाय देखील चालू करू शकता. जर समजा स्कूटरची चावी आपल्या खिशात असेल तर चावी तुम्हाला स्कूटरच्या लॉकला लावण्याची आवश्यकता नाही. आपण तेथील एक बटन दाबून स्कूटर चालू करू शकता.

फेसबुक पेज लाईक करा –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like