पाकिस्तान आखतोय नवा ‘कट’, दहशतवाद्यांकडून ‘ड्रोन’ हल्ल्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप सरकारने काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० हटविले. हे कलम हटवल्यानंतर ही गोष्ट पाकिस्तानच्या जिव्हारी लागली असून पाकिस्तानचा जळफळाट होतोय. यामुळे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी दहशतवाद्यांना जवळ करून हल्ल्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. तसेच या हल्ल्यांसाठी एक खास ड्रोन तयार करण्यात येणार असून त्या ड्रोनच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये हल्ले करण्याचे मनसुबे आखले जात असल्याचे समजते. सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटचा हल्ला यातून पाकिस्तानला मोठा धक्का भारताने दिला तरीही पाकिस्तानच्या प्रवृत्तीत काहीच सुधारणा होत नसल्याचे समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रोन रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा जीपीएस असलेले नसून ते प्री लोडेड प्रोग्रॅम असणारे आहेत. त्यामुळे या ड्रोनचा धोका अधिक असतो. कारण या ड्रोनमध्ये अचूक पद्धतीने टार्गेट फिड करण्यात येते. विशेष म्हणजे हे ड्रोन जेव्हा उड्डाण करते तेव्हा त्याचा जमिनीशी संपर्क हा तुटत असतो आणि निश्चित केलेल्या ठिकाणी ते अचुक मारा करते.

पाकिस्तानने आता भारतीय सुरक्षा दलाला चकवा देण्यासाठी व्युव्हरचना आखली असल्याचे देखील समजत असून भारताच्या दबावामुळे त्यांनी आपल्या रणनीतीत बदल केला असून मोठ्या लाँच पॅड ऐवजी आता ते फक्त दोन किंवा तीनच्या गटागटांत एकत्र येत आहेत असे देखील गुप्त सूत्रांनुसार पुढे आले आहे.

सध्या जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत असल्याने सध्यातरी घुसखोरीला आळा बसलाय. हिमवर्षावामुळे भारतीय सीमेतून घुसखोरी करणे हे दहशतवाद्यांना शक्य नाही. त्यामुळे दहशतवादी अजून काही काळ बर्फ वितळण्याची वाट बघतील. एकूणच दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारताकडूनही काही उपाययोजना करण्यात येत असून दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना हाणून पाडण्यात येईल अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/