ब्रिटनमध्ये कोरोनाच्या आणखी एका नव्या स्ट्रेनमुळे खळबळ, दक्षिण अफ्रीकेच्या उड्डाणांवर प्रतिबंध

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन सापडल्याने संपूर्ण जग भितीच्या छायेत आहे. या दरम्यान ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी बुधवारी सांगितले की, दक्षिण अफ्रीकेहून प्रवास करून आलेल्या काही लोकांच्या संपर्कात येणार्‍यांमध्ये कोरोना व्हायरसचा आणखी दुसरा नवीन व्हेरिएंट आढळला आहे. ज्यानंतर मागील दोन आठवड्यात दक्षिण अफ्रीकेतून येणार्‍या सर्व लोकांना स्वताला आयसोलेट होण्यास सांगण्यात आले आहे.

म्हणजे ब्रिटनमध्ये कोरोनाचा अतिशय वेगाने पसरणारा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर, आता तिथे व्हायरसचा आणखी दुसरा नवीन स्ट्रेन समोर आला आहे, जो अति संसर्गजन्य आहे. अजूनपर्यंत या नव्या दुसर्‍या स्ट्रेनची 2 प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने ब्रिटनमध्ये ज्याप्रकारे नुकसान पोहचवले आहे, तसेच तो दक्षिण अफ्रीकेत सुद्धा आजर वेगाने पसरवत आहे. एक्सपर्टनुसार, कदाचित यासाठी देशाला कोरोनाची दुसर्‍या मोठ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. असेही म्हटले गेले आहे की, कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन, अगोदरच्या व्हायरसच्या तुलनेत 70 टक्के जास्त वेगाने पसरतो.

तर, दक्षिण अफ्रीकेच्या आरोग्य विभागाने मागील आठवड्यात म्हटले होते की, व्हायरसचा एक नवीन जेनेटिक म्यूटेशन आढळले आहे आणि नुकत्याच वाढलेल्या संसर्गासाठी तोच जबाबदार असू शकतो. ब्रिटनने घोषणा केली आहे की, त्यांना कोविड-19 चा आणखी एक नवीन स्ट्रेन मिळाला आहे हा नवीन स्ट्रेन खुपच संसर्गजन्य आहे.

हँकॉक यांनी पुढे म्हटले, दक्षिण अफ्रीकन्सच्या प्रभावी जीनोमिक क्षमतेमुळे, आम्हाला ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या आणखी एका नवीन व्हेवेरिएंटची दोन प्रकरणे आढळली आहे. त्यांच्यानुसार, नवीन व्हेरिएंटची दोन्ही प्रकरणे त्या लोकांच्या संपर्कात आल्याने समोर आली आहेत, ज्यांनी मागील काही आठवड्यात दक्षिण अफ्रीकेचा प्रवास केला होता.

तर, ख्रिसमस आणि न्यू ईयरच्यापूर्वी ब्रिटनमध्ये लावण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे विरोधकांनी बोरिस जॉन्सन सरकारवर निशाणा साधला आहे.