काळजी नको ! स्वतःचे घर नाही, घर शोधताय पण मिळत नाही ; सरकारकडे करा ऑनलाइन अर्ज अन् मिळवा घर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही शहरात स्वतःच घर असावं असे सामान्य माणसाचे स्वप्न असते. मात्र आजच्या या महागाईच्या युगात स्वतःचे घर घेणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. केंद्र सरकार पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून निवडक नागरिकांना घरे देण्याचा प्रयत्न करत असते. मात्र सर्वांनाच घरे देणे सरकारला शक्य नाही. मात्र दिल्ली सरकारने अशा लोकांसाठी नवीन योजना आणली आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण देखील सुरु करण्यात आले आहे.

ज्या नागरिकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही त्यांच्यासाठी सध्या हे सर्वेक्षण सुरु आहे. त्यामुळे भविष्यात सरकारने पुन्हा एकदा घरांची नवीन योजना आणली तर त्या योजनेत या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दिल्ली विकास प्राधिकरण यांच्यामार्फत सध्या हे सर्वेक्षणाचे काम सुरु असून यासाठी सरकारने ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर नाही केवळ अशा नागरीकांसाठीच हि योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. www.dda.org.in या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर हे अर्ज भरून याची एक प्रत जवळच्या कार्यालयात जमा करण्यास देखील सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हे सर्वेक्षण केंद्रीय आवास आणि नगरविकास मंत्रालयाच्या सूचनांनुसार करण्यात येत असल्याचे दिल्ली विकास प्राधिकरणच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे सर्वेक्षण १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या यादीतील लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा देखील लाभ मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –