Coronavirus : कुठं गेले तबलिगी मरकजमधील ‘रोहिंग्या मुस्लिम’, सरकारच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना साथीच्या विरोधात सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान मार्चमध्ये तबलीगी मरकजमध्ये सामील झालेले शेकडो रोहिंग्या मुस्लीम ‘आपत्ती’ बनून फिरत आहेत. हे शेकडो रोहिंग्या मुस्लीम कोरोनाच्या विळख्यात अडकून दिल्लीतील लोकांना अडचणीत आणू शकतात. ही चिंता दिल्ली सरकारबरोबरच दिल्ली पोलिसांनाही त्रास देत आहे.

रोहिंग्या मुस्लिम आपल्या कॅम्प मध्ये परतले नाहीत

प्राप्त माहितीनुसार मार्चच्या दुसर्‍या पंधरवड्यात विविध राज्यांतील शेकडो रोहिंग्या मुस्लिमांनीही तबलीगी मरकजमध्ये भाग घेतला. मरकजमध्ये सामील जमातींबरोबरच ते तबलीगी मरकजहून बाहेर पडले, पण ते त्यांच्या कॅम्पात परत आले नाहीत. अशा परिस्थितीत मकरजमधील या रोहिंग्या मुस्लिमांनी दिल्लीत कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता वाढविली आहे.

रोहिंग्या मुस्लिमांच्या शोधात आहे दिल्ली पोलिस गुन्हे शाखेची टीम

सूत्रांच्या माहितीनुसार, या बेपत्ता झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम सतत छापा टाकत आहे, परंतु अद्यापपर्यंत यश मिळू शकलेले नाही. हे लोक जेथे लपून बसू शकतील अशा ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आहे. दरम्यान कॅम्प मध्ये परत न आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांनी दिल्ली पोलिसांची झोप उडवली आहे. वास्तविक, लॉकडाऊन दरम्यानही दिल्ली पोलिसांना तबलीगी मकरजमध्ये सामील झालेल्या हजारो जमावबंद्यांकडून धडा घ्यायचा आहे आणि अशा रोहिंग्या मुस्लिमांना लवकरात लवकर पकडून चिंतेतून मुक्त व्हायचे आहे. कारण तबलीगी जमातचे प्रकरण जेव्हा उघडकीस आले, तेव्हापासून दिल्ली पोलिस गोत्यात आली आहे, कारण काही झाले तरी हजारो लोक कसे पोलिस स्टेशनपासून फक्त 50 मीटर अंतरावर एकत्र जमू शकतात आणि पोलिस फक्त हातावर हात ठेऊन गंमत पाहू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत असल्याने दिल्ली पोलिसांनी आता कंबर कसली आहे.

रोहिंग्या कॅम्प मध्ये परत का आले नाहीत?

दिल्ली पोलिसांसह गुप्तचर यंत्रणांनाही चिंता आहे की निझामुद्दीनमधील तबलीगी मरकज जमातमध्ये सामील झाल्यानंतर रोहिंग्या मुस्लिम कॅम्पमध्ये परत का आले नाहीत? यामागे गुप्तचर यंत्रणांनी कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वस्तुतः तबलीगी मकरजमधून बेदखल होण्याच्या वेळी, जमातींनी ज्या पद्धतीने रस्त्यावर थुंकण्यासारखे प्रकार केले होते, त्याने रोहिंग्या मुस्लिमांवर अजून शंका वाढली आहे, की हे लोक एखाद्या षडयंत्राने तर गायब झाले नसावेत.

रोहिंग्या शरणार्थी आणि तबलीगी जमात यांच्यातील लिंकचा शोध

इंटेलिजेंस इनपुट मिळण्याच्या आणि कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या काही दिवस आधी केंद्रीय गृह मंत्रालयाने यूपी, हरियाणा, पंजाबसह सर्व राज्यांच्या सरकारांना रोहिंग्या शरणार्थी आणि तबलीगी जमात यांच्यातील संबंधांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. गौतमबुद्धनगर, मेरठ, कानपूर, मथुरा, सहारनपूर, फिरोजाबाद, मुझफ्फरनगर, बिजनौर आणि अलीगड जिल्ह्यांतील पोलिसांना रोहिंग्या निर्वासितांबद्दल ठोस माहिती गोळा करण्यासाठी डीजीपी मुख्यालयाकडून निर्देश जारी करण्यात आले होते.