Coronavirus : पुण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी जनता वसाहतीतून आली नवीन धक्कादायक माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा विळखा घट होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. दाटीवाटीच्या वस्ती आणि झोपडपट्टीच्या भागात पसरलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणं आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या जनता वसाहतीमधून नवी माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या मेहनतीनं कोरोनाला रोखणाऱ्या जनता वसाहतीत आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. या वसाहतीत 14 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर मागील 9 दिवसांत या भागातील कोरोना बाधितांची संख्या 42 वर पोहचली आहे. एकीकडे, मुंबईत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाने आपल्या पाय घट्ट रोवले असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यानंतर आता पुण्यातील झोपडपट्टीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे.

दाट लोकवस्ती असलेल्या भागात सोशल डिस्टन्सिंगचा, स्वच्छता अशा उपाय योजना करणं अवघड होत आहे. त्यामुळे कोरोनासारखा विषाणू अशा भागातून हद्दपार करणं हे प्रशासनासमोरील एक मोठं आव्हान आहे. त्यामुळे आता पुण्यातील जनता वसाहतीत आगामी काळात आणखी रुग्णांमध्ये वाढ होऊ न देण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 487 झाली आहे. तर 3 हजार 15 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 195 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशा माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील 5367 कोरोनाबाधित रुग्ण असून 2770 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अॅक्टिव्ह रुगणांची संख्या 2334 आहे. कोरोनाबाधित 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like