New Labour Code 2022 | नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी लवकर? Modi Government ’या’ महिन्यापासून लागू करणार आठवड्यातील 3 दिवस सुट्टीचा नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – New Labour Code 2022 | नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले आहे. परंतु, अद्याप याबाबतची तारीख ठरलेली नाही. सरकार (Modi Government) एक ऑक्टोबरपासून हा कायदा लागू करू शकते. 1 जुलैपासून तो लागू होईल अशी यापूर्वी चर्चा होती. नवीन कामगार कायद्याबाबत कर्मचार्‍यांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. या कायद्यात कोण-कोणत्या तरतुदी आहेत ते जाणून घेवूयात. (New Labour Code 2022)

 

नवीन कामागर कायद्यानुसार कर्मचार्‍यांना आठवड्यातील 48 तास काम करावे लागणार आहे.
आठवड्यात सलग चार दिवस बारा तास काम करावे लागणार आहे. 12 तासात दोन वेळा अर्धा-अर्धा तासाची सुट्टी असेल.
चार दिवस बारा-बारा तास काम केल्यानंतर कर्मचार्‍यांना सलग तीन दिवसांची मोठी सुट्टीही मिळेल. या कामगार कायद्याला काही कर्मचारी संघटनांचा विरोधही होत आहे.

 

खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना रिटायर्डमेंटनंतर पैशांची कमतरता भासू नये,
यासाठी पीएफमधील योगदान वाढविण्याची सुद्धा तरतुद या नवीन कामगार कायद्यात आहे.
यामुळे टेक होम सॅलरी कमी होणार आहे. तर निवृत्तीच्या वेळी जास्त पैसे मिळणार आहेत.
पगारातून जास्त पैसे कापले जाणार असून ते पैसे पीएफ खात्यात राहतील. ग्रॅच्युइटीही पूर्वीच्या तुलनेत वाढणार आहे.

 

Web Title :- New Labour Code 2022 | PM narendra modi government will implement three days holiday rule from this month pf rules will also change New Labour Code 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena MP Revolt | शिवसेनेच्या 12 खासदारांचा CM एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

 

MP Rahul Shewale | युतीसाठी उद्धव ठाकरेंची PM नरेंद्र मोदींसोबत बंद दाराआड एक तास चर्चा, खासदार राहुल शेवाळेंचे गौप्यस्फोट

 

Eknath Shinde | बाळासाहेबांनी लिहिलेली शिवसेनेची घटना काय सांगते; CM एकनाथ शिंदेंना नुसते आमदार, खासदार पुरेसे नाहीत?