Eknath Shinde | बाळासाहेबांनी लिहिलेली शिवसेनेची घटना काय सांगते; CM एकनाथ शिंदेंना नुसते आमदार, खासदार पुरेसे नाहीत?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी करत मुळ पक्षावर हक्क सांगणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांना नोटीसा बजावणे, पदाधिकार्‍यांना काढून टाकून नवीन नेमणूका करणे, पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर करणे, असे प्रकार चालवले आहेत. मुळात शिंदे आणि बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) सतत कायद्याची टांगती तलवार असल्याने शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ देखील स्थापन केलेले नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची घटना (Constitution) नेमकी काय सांगते हे पाहणे महत्वाचे ठरते. पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पक्षाच्या घटनेत अनेक तरतूदी नोंदवलेल्या आहेत.

 

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) दिल्लीत असून ते ते निवडणूक (Election) आयोगाची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. तसेच ते भाजपा (BJP) नेते आणि वकिलांच्या गाठीभेटी घेत आहेत. शिंदे सातत्याने शिवसेना पक्षावर दावा करत आहेत. पण शिंदे खरोखरच शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेचे चिन्ह घेऊ शकतात का? या प्रश्नांच्या उत्तरांसह शिवसेना पक्षाची घटना काय सांगते आणि सुधारित पक्षांतर बंदी कायदा (Prohibition of Defection Act) महत्वाचा ठरतो.

 

उद्या या संदर्भात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश (Chief Justice) उद्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेणार असून त्यामध्ये कोर्ट काय निर्णय देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: शिवसेना पक्षाची घटना तयार केली असून तिची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार वेगळे झाल्याने आमच्याकडे दोन्ही ठिकाणी दोन तृतियांश बहुमत आहे, यामुळे शिवसेना हा पक्ष आमचा असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत आहेत.

 

प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्थापनेच्या वेळी एक घटना तयार केली जाते. ती निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर केली जाते. यानंतर निवडणूक आयोग त्या पक्षाला मान्यता देतो. 21 जूनला शिवसेनेच्या कार्यकारिणीची शेवटची बैठक झाली होती. त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच पक्ष प्रमुख (Party Leader) म्हणून मान्यता देण्यात आली होती. तसेच सर्वांनी ठाकरे यांनाच पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

 

शिवसेनेची स्थापना 1966 ला झाली तेव्हा तो प्रादेशिक पक्ष (Regional Party) होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1976 मध्ये शिवसेनेची घटना तयार केली. यानुसार तेव्हा शिवसेना प्रमुख पदानंतर 13 सदस्यांची कार्यकारिणी पक्षाचे कोणतेही निर्णय घेऊ शकेल, अशी घोषणा करण्यात आली होती.

 

1989 मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेला राज्यस्तरीय पक्ष म्हणून ’धनुष बाण’ हे चिन्ह दिले.
यानंतर शिवसेना वाढत गेली. राज्यात भाजपासोबत आलेले युती सरकार, केंद्रात मंत्रिपदे, सभापती पद, इत्यादीयश मिळाले.
पण बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश अंतिम ठरत होता.

 

2003 मध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाबळेश्वर येथील सभेत उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख करण्याचा प्रस्ताव मांडला.
त्यावेळी 282 सदस्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधीगृहाने हा प्रस्ताव मंजूर केला आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले.
त्यानंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, आणि त्यांनी मनसे (MNS) पक्षाची स्थापना केली.

काय सांगते शिवसेनेची घटना

पक्ष घटनेतील कलम 11 नुसार शिवसेना पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना काढून टाकण्याचा अधिकार प्रतिनिधी गृहाकडे.

पक्षप्रमुखांनी नियुक्त केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्याला काढून टाकण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे.

त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे एखाद्याची निवड रद्द करू शकतात.
याच अधिकाराचा वापर करत त्यांनी एकनाथ शिंदे आणि भावना गवळी (Bhavna Gawli) यांच्यावर कारवाई केली.

शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार (MP) यांच्या बळावर एकनाथ शिंदे धनुष्य बाणावर दावा करू शकणार नाहीत,
असे शिवसेनेच्या घटनेचे जाणकार सांगतात.

शिंदे यांना किमान 250 प्रतिनिधी असलेल्या शिवसेना पक्षातून निवडून यावे लागेल.

त्यानंतरच त्यांना निवडणूक आयोगाची मान्यता मिळेल आणि ते शिवसेनेवर दावा सांगू शकणार आहेत.

मात्र, या निवडून आलेल्या नेत्याला बरखास्त करण्याचा अधिकार पुन्हा पक्षप्रमुख यांच्याकडेच असतो.

यामुळे या घटनेनुसार शिंदे गटाचे भविष्यातील दावे धोक्यात येणार आहेत, अशी माहिती एका वेबसाईटने दिले आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | CM eknath shinde latest news mlas mps are not enough for eknath shinde to acquire party what does the caonstitution of shiv sena written by balasaheb thackeray say uddhav thackeray will supremo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर बलात्कार, फेसबुकवर झाली होती ओळख

 

Devendra Fadnavis | ‘पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करणार’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)