पोलीस अधिकाऱ्यांसाठी ‘Tik Tok’ बनले डोकेदुखी, प्रशासनानं काढलं ‘हे’ फरमान

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरात पोलीस कर्मचाऱ्यांकडून आपले व्हिडिओ Tik Tok वर पोस्ट केल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरातचे महानिरीक्षक शिवानंद झा यांनी अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या व्हिडिओ मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि सोशल मीडियावर अपलोड करण्यापासून सतर्क राहण्यास सांगितले आहे. एखादा पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना, निलंबित किंवा साध्या कपड्यावर असताना अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस महानिरीक्षकांनी पोलीस कर्मचारी आणि आधिकाऱ्यांसाठी एक परिपत्रक काढून त्यांना अशा प्रकारच्या कृत्यापासून लांब राहण्यास सांगितले आहे. ज्यामुळे त्यांची आणि पोलिसांची सार्वजनिक नींदा हाेईल तसेच पोलिसांची प्रतिमा मलिन होईल. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित झाल्यानंतर काही दिवसांनी महानिरीक्षकांनी हा अद्यादेश काढला आहे. निलंबित झालेल्यांमध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

पोलीस महानिरीक्षकांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना Tik Tok आणि इतर सोशल मीडियाचा वापर करताना गुजरात सेवा नियम आणि गुजरात पोलीस कायदाच्या कलमांचे पालन केले पाहिजे असे परिपत्रक काढले आहे. तसेच या परिपत्रकानुसार Tik Tok चा वापर करण्यास बंदी नाही तर पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारे आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणे टाळले पाहिजे, असे म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त